राखी स्टॉल विक्री करणाऱ्यास मटका व्यवसायिकाने मागितली खंडणी
Satara News Team
- Sun 7th Aug 2022 07:25 am
- बातमी शेयर करा
सातारा : रक्षा बंधन जवळ आलेले आहे. त्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी राखी विक्रीचे स्टॉल लागलेले असून यातील एका स्टॉल चालकास तीन हजार रुपयांची खंडणी एका मटका व्यवसाय करणाऱ्याने मागितल्याने खळबळ उडाली. हा प्रकार सातारा बसस्थानक परिसरातील फूट पाथवर शनिवारी सकाळी घडला असून याची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरात रक्षा बंधन जवळ आल्याने राखी विक्रीचे स्टॉल ठिकठिकाणी लागले आहेत. राखी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. बस स्थानक परिसरातील फूट पाथवर असलेल्या राखी स्टॉलवर काही ग्राहक राखी खरेदी करत असताना एक मटका व्यवसाय करणारा आला. तो त्या विक्रेत्यास म्हणाला, स्टॉल येथे कोणाच्या परवानगीने टाकले आहेस. मला तुला तीन हजार हप्ता द्यावा लागेल. नाही तर सर्वच स्टॉलचे अतिक्रमण काढा म्हणून उपोषण पालिकेसमोर करतो. जास्त हुशार बनलास तर तुझ्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी दिल्याने तो विक्रेता भयभीत झाला. त्याच्याशी झालेल्या या प्रकाराने इतर स्टॉल धारकही भयभीत झाले. दरम्यान, कोरोना काळात सर्वच व्यवसाय बंद झाले होते. काहींच्या नोकऱ्या गेल्या होत्या. मिळेल तो व्यवसाय करू लागले असून त्यात ही असे प्रकार होत असल्याने नव व्यावसायिक हतबल झाल्याची दिवसभर चर्चा सुरू होती. तसेच मटका व्यावसायिकाने खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसात कसलीही नोंद झालेली नाही.हे प्रकरण चिघळण्याची शक्यतासातारा शहरात बस स्थानक ते पोवई नाका या दरम्यान असलेले स्टॉल, टपऱ्या यांचा मुद्दा सतत उफाळून येतो. त्यातच मटका व्यावसायिकाने तीन हजार रुपयांची खंडणी मगितल्याची जोरदार चर्चा सातारा शहरात झाल्याने हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. स्टॉल धारक संघटना आणि संबंधित व्यवसायिक यांच्यात वाद निर्माण होण्याची चर्चा सुरू होती. हॉकर्स संघटनेकडे तक्रारसातारा शहरातील हॉकर्स संघटना शहरातील हॉकर्स, टपरीवाले, फेरीवाले यांच्याकडे समस्या मांडत असतात. त्या समस्या सोडवण्यासाठी हॉकर्स संघटना पाठपुरावा करत असते. आज ही खंडणीच्या घटनेची माहिती हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांना मिळाली होती. त्यांच्याकडे संबंधित विक्रेत्याने घडलेली घटना मांडली असून हॉकर्स संघटना काय भूमिका घेणार याची चर्चा सुरू होती.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sun 7th Aug 2022 07:25 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sun 7th Aug 2022 07:25 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sun 7th Aug 2022 07:25 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sun 7th Aug 2022 07:25 am
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Sun 7th Aug 2022 07:25 am
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Sun 7th Aug 2022 07:25 am
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Sun 7th Aug 2022 07:25 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sun 7th Aug 2022 07:25 am
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sun 7th Aug 2022 07:25 am
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sun 7th Aug 2022 07:25 am
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 7th Aug 2022 07:25 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sun 7th Aug 2022 07:25 am













