मर्सिडीज वरून सुरू झालेलं राजकारण चड्डीनंतर आलं कमिशनवर!

निवडून न येणाऱ्यांनी आमची मापे काढू नयेतःगणेश सत्रे

दहिवडी  : माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडीतील संपर्क कार्यालयात अभय जगताप यांनी घेतलेल्या मर्सिडीजवरून अभय जगताप आणि अनिल देसाईंवर जोरदार संधान साधले होते.याचाच धागा पकडत अभय जगताप यांनी दहिवडीतील शासकीय विश्रामगृहात आमदार गोरे यांना चड्डी घालायला नव्हती त्यावेळेस माझ्याकडे चार चाकी गाडी होती अशी एकेरी टीका केली होती. त्यानंतर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनीही आमदार गोरे यांना कुत्र्याची उपमा देत त्यांचा एककेली उल्लेख केला होता. 

त्यानंतर माण खटाव विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना हा एक केळी उल्लेख चांगला जिव्हारी लागल्याचे संपूर्ण सातारा जिल्ह्याने पाहिले आहे. त्यानंतर मान तालुका भाजपा मंडलाध्यक्ष गणेश सत्रे यांनी भाजपातर्फे अनिल देसाई यांनी अभय जगताप यांचा जाहीर निषेध पत्रकार परिषदेतून केला होता.जगताप आणि देसाई यांनी 2024 च्या विधानसभेच्या रणांगणात येण्याचे आवाहनही त्यांना दिले होते. सोमनाथ भोसले विशाल घोरपडे नगरसेवक रुपेश मोरे यांनी तर त्यांना खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचे संपूर्ण सातारा जिल्ह्याने पाहिले आहे. रुपेश मोरे यांनी देसाई,जगताप यांना आमदार गोरेंवर टीका केल्यानंतर एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.त्यानंतर अनिल देसाई यांच्या दहिवडीतील संपर्क कार्यालयात त्यांचे समर्थक अण्णा मगर,पिंटू जगदाळे,समीर ओंबासे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा पदाधिकाऱ्यांवर जोरदार तोफ डागली होती. 

आण्णा मगर म्हणाले की,गणेश सत्रेंनी शेखर गोरे यांच्याशी फारकत घेत आमदार गोरे गटात प्रवेश केला खरा पण मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत आमदार गोरे यांनी गणेश सत्रे यांना जवळपास 40-50 लाख रुपयांना खड्ड्यात घातले आहे. तसेच समीर ओंबासे यांनीही गणेश सत्रेंवर शाब्दिक टीकास्त्र केले होते.

यावर प्रत्यूत्तर देताना गणेश सत्रे म्हणाले की,येत्या विधानसभेला आखाड्यात या एवढीच आमची इच्छा आहे. 2014 च्या विधानसभेला आपले डिपॉझिट जप्त झालेले विसरू नका. त्यावेळी माण खटावच्या जनतेने आपणास पाचव्या क्रमांकाची मते दिलेली विसरू नका. शेखर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात आलो.शेखर गोरे माझे राजकीय गुरु आहेत.आजही आमचे सलोख्याचे संबंध आहेत.यामध्ये शेखर गोरे यांचा कोणताही संबंध नसताना तुम्ही त्यांचे नाव घेतलेच कसे. एवढीच खुमखुमीला आहे तर तीस वर्षात आमदार का झाला नाही,याचे उत्तर अगोदर जनतेला द्या. जिल्हा बँकेत जयकुमार गोरे संचालक होते.त्यावेळीचा इतिहास आठवा.आमदार गोरे यांनी नोकर भरती विरोधात उपोषण केले होते तेव्हा रामराजे निंबाळकरांना सुद्धा जयकुमार गोरे काय चीज आहे याची कल्पना आली होती. वरकुटे ग्रामपंचायतीला आमदारांसोबत येण्यासाठी कोणीही आग्रह केला नव्हता उलट आमदारांशेजारी न बोलवता येऊन बसला आणि त्या अपशकुनामुळे ग्रामपंचायतची सत्ता गेली. मजूर फेडरेशन ला 11 मते पडली असून 160 ठेकेदार असल्याची वल्गणा करणाऱ्यांनी स्वतःचे अस्तित्व तपासावे.देसाईंकडे चार वर्षांपूर्वी एका खाजगी कामानिमित्त गेलो होतो. त्यानंतर त्यांची 20% ची टक्केवारी पाहून तिथून निघून आलो. वैयक्तिक माझे चार वर्षानंतरचे सीसीटीव्ही फुटेज असतील तर मीडिया समोर दाखवा. साताऱ्यात शिवेंद्रराजेंसोबत,फलटणमध्ये रामराजेंसोबत,तर माण खटामध्ये आल्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सामील होता.अगोदर नक्की तुम्ही कोणत्या पक्षात आणि कोणत्या गटात आहे हे तरी जनतेला माहिती होऊ द्या. स्वार्थापोटी तुम्ही कुणाचीही तळी उचलता हे जगजाहीर आहे. तीस वर्षे राजकारणात असूनही ग्रामपंचायतीत सत्ता ठेवता आली नाही.

राज्याच्या राजकारणात कमी कालावधीत पक्ष बदलण्याचा विक्रम देसाईंवरच असावा. राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय जनता पार्टी,शिवसेना या अनेक पक्षात स्वतःच्या राजकीय स्वार्थ पोटी पक्षप्रवेश करणाऱ्यांनी आमची मापे काढू नयेत. प्रत्येक निवडणुकीला मुंबई,पुण्यातील कोणकोणत्या उद्योगपती मार्फत निवडणूकीला मध्यस्थी करता याची जनतेला कल्पना आहे.भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना घरगड्यामार्फत प्रत्युत्तर देण्याची वेळ देसाईंवर आल्याची टीका गणेश सत्रे यांनी केली.वडगावचा दीड फुट्या आणि वडजलचा घरगडी महिलांचा मार खाण्यात तरबेज आहेत. या दोघांनाही मी ओळखत नाही.देसाईंमध्ये जर ताकद असेल तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन याचे उत्तर द्यावे असा टोलाही गणेश सत्रे यांनी लगावला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त