मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अचानक साताऱ्यात दाखल झाल्याने प्रशासनाची तारांबळ

सातारा: मुंबईहून आपल्या दरे (महाबळेश्वर) गावाकडे दोन दिवस मुक्कामी निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळे पुन्हा राजभवन हेलिपॅडवर तातडीने उतरविण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरने ते दरे गावांकडे निघाले. मात्र, महाबळेश्वर परिसरात सातत्याने पाऊस पडत असून हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर सातारकडे आणण्यात आले. सैनिक स्कुलच्या हेलिपॅडवर उतरुन मुख्यमंत्री शिंदे शासकिय विश्रामगृहात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  दोन दिवस आपल्या दरे या मुळगावी मुक्कामी येणार होते. यासाठी सकाळी राजभवन येथून हेलिकॉप्टरने टेक ऑप केले. साधारण वीस मिनिटातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये खराबी आल्याने पुन्हा तातडीने राजभवन हेलिपॅडवर उतरविण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री शिंदे हे सातारकडे रवाना झाले. पण, महाबळेश्वर परिसरात सातत्याने पाऊस पडत असून हवामान खराब झालेले आहे. त्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर सातारला आणण्यात आले. येथील सैनिक स्कुलच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले. मुख्यमंत्री साताऱ्यात येणार असल्याचे समजताच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व पोलिस सैनिक स्कुलच्या हेलिपॅडकडे रवाना झाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पुढील प्रवासासाठी ताफाही तैनात ठेवला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी अधिकारी उपस्थित होते. हेलिपॅडवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडावेळ शासकिय विश्रामगृहात थांबले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त