दुचाकी नवीन वाहनांसाठी 0001 ते 9999 क्रमांकाची मालिका सुरु

सातारा :  दुचाकी वाहनांसाठी एम.एच.-11 डीआर, (दुचाकीसाठी 296 आरक्षीत क्रमांक सोडून) सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आपल्या आवडीचा नोंदणी क्रमांक देण्याकरिता कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.

आवडता क्रमांक घेण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार नोंदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार नियम 1989च्या नियम 5 अ मध्ये विहीत केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असणार आहे. अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र उदा. आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत सादर करावी लागणार आहे.

आकर्षक नोंदणी क्रमांक संगणकीय वाहन 4.0 या प्रणालीवर देण्यात येत असल्याने अर्जासोबत वाहनधारकाचा इमेल आयडी, आधार कार्ड क्रमांक, पीन कोड क्रमांक देणे बंधनकारक आहे. दि. 24 जून रोजी आकर्षक क्रमांकासाठी सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत स्वीकारले जाणार आहेत. एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणास अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत निर्धारीत फी पेक्षा जादा रकमेचा डीमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावा लागेल.

जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. तसेच उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येईल. आकर्षक क्रमांक आरक्षित केल्यानंतर 30 दिवसांच्या आत वाहनधारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्यांच्या वाहनांची पूर्वी नोंदणी झाली आहे. तथापि अद्याप नोंदणी क्रमांक घेतलेला नाही, अशा व्यक्तींना वरील चार मालिकांमधून पसंतीचे नोंदणी क्रमांक घेता येणार नाहीत, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालया सांगण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त