कराडमध्ये बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा
Satara News Team
- Fri 29th Mar 2024 11:22 am
- बातमी शेयर करा
कराड : शहरातील मंडईत चालविल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून ५० पेक्षा जास्त जनावरांची सुटका करण्यात आली. यावेळी काही जनावरांची कत्तल करण्यात आल्याचेही पोलिसांना दिसून आले. या कारवाईसाठी साताऱ्यातून मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. साताऱ्यातील विशेष पथकासह, कराडातील पोलीस उपाधीक्षक कार्यालय तसेच शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली.
शहरातील भाजी मंडईत बेकायदेशीर कत्तलखाना चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाकडून गत काही दिवसांपासून खातरजमा केली जात होती. कत्तलखान्यात गोवंशीय जनावरे आणली जाणार असल्याचे समजल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून पोलिसांनी त्याठिकाणी वॉच ठेवला होता. शुक्रवारी पहाटे पोलीस बंदोबस्तासह त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी ५० पेक्षा जास्त जनावरे त्याठिकाणी आढळून आली. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी काही जनावरांची कत्तल करण्यात आल्याचेही दिसून आले.
पोलिसांनी कत्तलखान्यातील जनावरे ताब्यात घेतली. तसेच याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईवेळी मंडई परिसरासह शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी साताऱ्याहून जादा पोलीस कुमक मागविण्यात आली होती. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Fri 29th Mar 2024 11:22 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 29th Mar 2024 11:22 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 29th Mar 2024 11:22 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 29th Mar 2024 11:22 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 29th Mar 2024 11:22 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 29th Mar 2024 11:22 am
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Fri 29th Mar 2024 11:22 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Fri 29th Mar 2024 11:22 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Fri 29th Mar 2024 11:22 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Fri 29th Mar 2024 11:22 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Fri 29th Mar 2024 11:22 am
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Fri 29th Mar 2024 11:22 am
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 29th Mar 2024 11:22 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Fri 29th Mar 2024 11:22 am













