असं वाटतंय तलवार घेऊन मुंडकी छाटून टाकू… उदयनराजे भोसले संतापले…

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलतांना उदयन राजे म्हणाले असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावी असं आक्रमकपणे म्हणत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्ही सहन केलं असतं का ? शिवाजी महाराज नसते तर तुमचे आई-वडीलही नसते असे थेट सुनावत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. सातारा येथे उदयनराजे यांनी हे विधान केले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यावर सगळे शांत बसले असले तरी मी शांत बसू शकत नाही. मी एक शिवभक्त आहे आणि त्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही असे म्हणत उदयनराजे पुन्हा एकदा आज भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सातारा येथे माध्यमांशी बोलत असतांना उदयनराजे यावेळी भडकल्याचे देखील पाहायला मिळाले.मी लढणारा आहे, मी रडणारा नाही, मी त्या दिवशी भावुक झालो होतो, शिवाजी महाराजांचा अवमान होता कामा नये नाहीतर नावच पुसून टाका म्हंटल्यावर मी भावुक झाल्याचे उदयनराजे यांनी म्हंटले आहे.

याशिवाय मी आज रायगडला जाणार आहे. उड्या शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन माझी भावना व्यक्त करणार आहे. त्यावेळी तिथं सगळंच बोलतो असा इशारा देखील उदयनराजे यांनी दिला आहे.वारंवार महाराजांचा होणारा अपमान, त्याला होणाऱ्या समर्थनावर उदयनराजे यांनी स्पष्टच सुनावलं आहे. लोकं कोडगी झाली आहेत. सोईप्रमाणे होणारा वापर हे चालणार नाही.दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपप्रवक्ते त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधाने केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त