फलटण येथील तय्यब कुरेशी टोळी तडीपार.

फलटण . महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 व प्राण्यांचाछळ प्रतिबंधक अधिनियम 1960 हे कायदे लागू आहेत. सदर व कायद्यानुसार जनावरांची कतलीसाठी वाहतूक करणे , कतली साठी जनावरे एकत्र जमा करणे मनाई असताना सुद्धा या टोळीचा प्रमुख तय्यब आदम कुरेशी वय 45 वर्षे, आणि त्याचे साथीदार आरीस गफूर कुरेशी वय 36, बिलाल रफिक कुरेशी वय 34, दिशान इमाम बेपारी उर्फ कुरेशी वय 20, अबू उर्फ अल्ताफ अफसर कुरेशी वय 26, सर्वजण राहणार कुरेशी नगर फलटण जिल्हा सातारा, कायद्याचे उल्लंघन करत होते. 


 टोळीतील हे सर्व पाचही जण सदस्य गोवंशय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करताना वारंवार मिळून आल्यामुळे त्यांच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. सदर टोळीवर फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत कुमार शहा यांनी सातारा जिल्ह्यातून तसेच नजीकच्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर व बारामती तालुका येथून दोन वर्ष तडीपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सातारा तथा हद्दपार प्राधिकरण यांच्याकडे सादर केला होता.


 या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण श्री राहुल आर.धस साहेब यांनी केली होती. सदरहू टोळीतील पाचही जणांना गुन्हे दाखल झाले असता त्यांच्यावर वेळोवेळी अटक करून प्रतिबंध कारवाई करून सुद्धा गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत बदल झाला नाही सदर टोळी फलटण व परिसरामध्ये तरीही सातत्याने गुन्हे करीत होते. 


सदरहू टोळीतील पाचही जणांच्या वर फलटण व परिसरातून कडक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार होत होती कारण या टोळीचा उपद्रव फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर होत होता. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी या सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये सातारा जिल्ह्यातून तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका व पुणे जिल्ह्यातील पुरंदर व बारामती तालुका हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपारीचा आदेश पारित केला आहे. नोव्हेंबर 2022 पासून 33 उपद्रवी टोळ्यांमधील 108 इसमांना मपोकाक 55प्रमाणे 38 इसमांना मपोकाक 56 प्रमाणे, म पो का क प्रमाणे चार इसमांना असे एकूण 150 इसमाविरुद्ध तडीपारची कारवाई करण्यात आली असून सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचे विरुद्ध हद्दपारी, मोक्का, एम पी डी ए, अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत. 

या कामी हद्दपार प्राधिकरणा पुढे सरकार पक्षाच्यावतीने श्रीमती वैशाली कडू कर, (अप्पर पोलीस अधीक्षक सातारा,) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बापू धायगुडे, सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र टिके, यांनी योग्य तो पुरावा सादर केला. या कारवाईबाबत फलटण शहर व फलटण शहरातील परिसरातील जनसामान्यांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त