जोशी विहीर येथील धोम पुर्नवसन येथे मध्यरात्री धाडसी चोरी,चोरट्यांनी नेले तब्बल १ लाख ८१ हजाराचे दागिने

आजूबाजूच्या घरांना ही कड्या लावल्याने मदतीसाठी बोलाहून ही कोणाला येता आले नाही परिसरातील ग्रामस्थ भयभीत

सातारा : याबाबत भुईंज पोलीसांनी दिलेली माहिती अशी की महामार्गावरील जोशीविहीर नजीक असलेल्या धोम पुर्नवसन येथील राहुल शिवाजी पोळ यांच्या राहत्या घरात दिनांक ५ रोजी मध्यरात्री अज्ञात चार ते पाच चोरटयांनी कडी काढून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि लाकडी कपाटातील लॉकरमधील स्टीलच्या डव्यातील सोन्याचे दागिने रक्कम रू.१ लाख ८१ हजार ५०० रूपयाचे दागिने घेवून पळून गेले. या दरम्यान कपाटाच्या झालेल्या आवाजाने जागे झालेले पोळ कुटुंबीय आराडाओरडा करत मदतीसाठी हाका मारत होते व त्यांच्या समोर अज्ञात पाचजण काळी कपडे परिधान केलेले निघून गेले.

      परंतु शेजा-यांच्याहि घरांना बाहेरून कडी लावल्याने कोणाला हि इच्छा असून हि मदतीसाठी येता आले नाही. घडलेल्या प्रकारानंतर पोल कुटुंबीयांनी भुईंज पोलीसात तकार दाग्यल केल्यानंतर भुईजचे सपोनि रमेश गर्जे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून तपासासाठी सुचना केल्या तर घरात पडलेले अस्ताव्यस्त साहित्य व ठसे तज्ञ यांना बोलावून तपासासाठी पथक रवाना करण्यात आले यावेळी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाळासाहेब भालचिम यांनी घटनास्थळी भेट देवून मार्गदर्शनपर सुचना केल्या. पुढील तपास भुईजचे सपोनि रमेश गर्जे साहेब हे करीत आहेत.

     " गेले दोन तीन दिवस पहाटे फिरायला जाणा-या महिलांना अज्ञातांच्याकडून धमकावून सोने लुटण्याचा घटना पाचवड बस स्थानक ते शेवाळे वस्ती या दरम्यान व भुईज बस स्थानक ते चिंधवली रस्ता व महामार्गावर होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुईज ग्रामपंचायतीने वस स्थानक परिसरात बसवलेली ध्वनी क्षेपक सुचना यंत्रणा गेली दोन वर्ष बंद आहे. ती त्वरीत सुरू करावी अशी मागणी महिला वर्गातून होत आहे."

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त