वडापावचा गाडा बंद केल्याच्या रागातून हनुमानवाडी येथे एकावर वार
गौरव खवळे
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
- बातमी शेयर करा
उंब्रज : उंब्रज गावाच्या हद्दीतील हनुमानवाडी तालुका कराड येथे वडापावचा गाडा बंद केल्याच्या रागातून एकास मारहाण झाल्याने उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 03 जुलै 2024 रोजी सायं. 7.00 वा. चे सुमारास हनुमानवाडी ता. कराड गावचे हद्दीत फिर्यादी राहते घरात वरच्या मजल्यावर टीव्ही बघत बसलेला असताना जगन्नाथ राजेंद्र जाधव रा. तळबीड ता. कराड याने वरचे गँलरीतुन आत घरातील हॉल मध्ये प्रवेश करून दोघांत चालु केलेला वडापावचा गाडा बंद केल्याचा राग मनात धरून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याने सोबत आणलेल्या चाकुने फिर्यादीच्या डावे दंडाजवळ, डोकीत, पाठीवर भोसकून व वार करून गंभीर दुखापत केली. त्यावेळी मला सोडविण्यास आलेला माझा पुतण्या संकेत दशरथ हत्ते यालाही डावे दंडाजवळ व उजवे मनगटावर चाकुने वार करून गंभीर दुखापत केली. तसेच पळुन जाताना माझे वडिल किसन सिताराम हत्ते यांना ढकलुन देवुन त्यांचे पायास दुखापत केली आहे. याबाबत दिपक किसन हत्ते वय- 42 वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा. हनुमानवाडी ता. कराड जि. सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास
उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि रविंद्र भोरे करीत आहेत .
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 4th Jul 2024 06:17 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Thu 4th Jul 2024 06:17 pm












