वनगळ-आरफळ रस्त्याला आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातयं ?

शासकीय अधिकाऱ्यांची चालू असलेल्या कामावर गांधारी ची भूमिका

सातारा : सातारा तालुक्यातील आरफळ-वनगळ रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीवरून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू झालेले आहे सदरचा पहिल्या टप्प्याला जे खडीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून काम चालू होण्याअगोदरच अंतरलेल्या खडीवर मुरूम टाकल्याने व चांगल्या पद्धतीने रोलिंग न झाल्याने पूर्णतः रस्त्याची खडी उखडलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातयं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे काम चालू असताना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारीच या रस्त्याकडे फिरकले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे


           वनगळ ते आरफळ रस्ता अंदाजे साडेपाच किलोमीटरचा असून हे काम तीन कोटी सत्तावन्न लाख 90 हजार रुपयांचे मंजूर झालेले आहे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विविध ठिकाणी कोट्यावधीची कामे चालू आहेत सातारा जिल्ह्यामध्ये डांबरीकरण रस्ता तसेच काँक्रिटीकरण रस्ता यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सर्वसामान्य लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत असताना संसदेमध्ये आवाज उठवून सातारा जिल्ह्यासाठी कोट्यावधी रुपये आणलेले आहेत परंतु वनगळ ते आरफळ रस्त्याचे काम संबंधित ठेकेदार अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत आहे एवढ्या मोठ्या रकमेचे काम चांगल्या पद्धतीने आणि दर्जेदार व्हावे ही सर्वसामान्य जनतेमधून इच्छा व्यक्त केली जात आहे. डांबरीकरण काम सुरू दिनांक २५/१/२०२३ आणि काम पूर्ण होण्याचा कालावधी २४.९.२०२४ असा कालावधी आहे पहिल्या टप्प्यामध्ये पहिला टप्पा पूर्ण करत असताना पहिल्या टप्प्याला पूर्णतः टाकलेली खडी  उखरलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातयं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. संबंधित शाखा अभियंता  एस एस ढेकळे यांच्याशी संपर्क साधला असता स्वतः त्यांनीच कबुली दिली की मी या साइटवर आलेलो नव्हतो.


वनगळ-आरफळ तालुका सातारा रस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराचा फलक लावलेला आहे त्यामध्ये कंत्राट दाराचे नाव ओमकार दत्तात्रय भंडारे सार्थक 39 प्रतापगंज पेठ सातारा अशी असून कार्यान्वय अधिकाऱ्यांचे नाव कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा सातारा असे आहे सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चाललेले असून सुद्धा बांधकाम विभागाचे अधिकारी गांधारीची भूमिका का घेतात हाही प्रश्न निर्माण झालेला आहे तरी संबंधित ठेकेदाराला चांगल्या दर्जाचे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी स्वतः याकडे लक्ष घालने गरजेचे आहे असेही सर्वसामान्य जनतेमधून बोलले जात आहे.

या रस्त्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी कोट्यावधी रुपये त्यांच्या शिफारशीवरून आणलेले असताना त्या पैशाचा वापर संबंधित ठेकेदाराने चांगल्या पद्धतीने केला पाहिजे असेही बोलले जात आहे
परंतु संबंधित ठेकेदार या रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने करत असल्याचे दिसून येत आहे पाच किलोमीटरचा रस्ता हा अतिशय चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे असताना सुद्धा याकडे अधिकारी वर्ग कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे तरी जर होणारे काम उत्कृष्ट पद्धतीने होत नसेल तर आणि जर केले जात नसेल तर सर्वसामान्य जनतेमधून हे आंदोलन केले जाणार आहे असे जनतेमधून बोलले जात आहे.

 


वनगळ-आरफळ रस्त्याचे चालू असलेले कामावर स्वतः जातीने लक्ष घालून व्यवस्थित न झालेले काम चांगल्या पद्धतीचे करून घेण्याचे सूचना शाखा अभियंता यांना दिलेले आहेत याबाबत संबंधित ठेकेदाराला चालू असलेल्या कामावर बोलावून लगेचच कार्पेट टाकण्याच्या सूचना दिल्या जातील.
एस एम भंडारे-उपअभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सातारा

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त