कराड येथील कृष्णा नाक्यावर महाविलयीन युवकांची धुवाधुवी.

कराड : दोन युवकांनी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना कराड येथील कृष्णा नाक्यावर असलेल्या पुलानजीक गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. नंतर बाचाबाची होऊन एकमेकांवर दगडफेक देखील झाली. सकाळी घडलेल्या या घटनेमुळे काहीकाळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळलेली माहिती अशी की, कराड येथील करूनही नाक्यावर नेहमी प्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थी जात होते. या ठिकाणी युवक आणि विद्यार्थ्यांच्यात सुरुवातीला काही कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. पुढे याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी एका युवकाने रागाच्या भरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

संबंधित एक युवकाने महाविलयीन शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या युवकास बेदम मारहाण केल्याच्या घटनेमुळे काहीकाळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच मारहाण करणाऱ्या युवकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त