ATM चोरांस धाडसाने अटक. कराड पोलीसांची अभिनंदनीय कारवाई ..

ATM thieves bravely arrested. Congratulatory action of Karad Police..
पोलिसांना बघताच सदर इसमानी नमूद अंमलदारांच्या डोळ्यावर स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. नमूद पोलीस पथकच्या डोळ्यावरती स्प्रे मारलेला असतानाही त्यांनी त्यामधील एका आरोपीस पकडून ठेवले व त्याही परिस्थीतीत पीसीआर मोबाईलला कॉल देऊन अतिरीक्त मदत मागितली. त्यानंतर पीसीआर मोबाईल मसपोनि सौ. शादिवान, बीट मार्शल 1, 2, व 3 एक सदर ठिकाणी गेले असता एक आरोपी नामे सचिन अशोकराव वाघमोडे, वय 38 वर्षे रा.आदर्श नगर, काळेवाडी, पुणे व एक होंडा ट्विस्टर मोटरसायकल क्रमांक एम एच 42 डब्ल्यू 54 41 कळ्या रंगाची असे ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणले आहे.

कराड : गजानन हौसिंग सोसायटी, येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम काही लोक फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत असा संदेश वायरलेस वरुन वायरलेस ऑपरेटर याना प्राप्त होताच वायरलेस कर्तव्यावरील महिला आमदार यांनी 02.48 वाजताच्या सुमारास दामिनी मोबाईल व बीट मार्शल-5 यांना गजानन हौसिंग सोसायटी जवळील बँक ऑफ इंडियाचे एटीएम काही लोक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत असा कॉल दिला. त्यानंतर तात्काळ दामिनी मोबाईल कर्तव्यावरील पो. ह.क्र. 220/राजगे, पो.ना. चा. क्र. 540/ पाटील तसेच बीट मार्शल-5 कर्तव्यावरील पो.ह.क्र. 1584/सूर्यवंशी, होमगार्ड 8427/ निकम यांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेवून पोहोचले असता तेथे चार इसम एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांना बघताच सदर इसमानी नमूद अंमलदारांच्या डोळ्यावर स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. नमूद पोलीस पथकच्या डोळ्यावरती स्प्रे मारलेला असतानाही त्यांनी त्यामधील एका आरोपीस पकडून ठेवले व त्याही परिस्थीतीत पीसीआर मोबाईलला कॉल देऊन अतिरीक्त मदत मागितली. त्यानंतर पीसीआर मोबाईल मसपोनि सौ. शादिवान, बीट मार्शल 1, 2, व 3 एक सदर ठिकाणी गेले असता एक आरोपी नामे सचिन अशोकराव वाघमोडे, वय 38 वर्षे रा.आदर्श नगर, काळेवाडी, पुणे व एक होंडा ट्विस्टर मोटरसायकल क्रमांक एम एच 42 डब्ल्यू 54 41 कळ्या रंगाची असे ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणले आहे. सदरची झटापट चालू असतानाच चालक पोशि यानी आम्हांस फोनवर घटना कळवली तेव्हा पळून गेलेल्या संशयीतांसाठी विभागात नाकाबंदी लावण्यास सांगीतली, जखमी पोलीस पथकास कॉटेज हॉस्पीटल येथे घेण्यास सांगीतले व संशयीत इसमास पोस्टेला आणण्यास सांगीतले. सदर कारवाई मध्ये पो.ह.क्र 220 / राजगे, पो. ह. क्र. 1584/ सूर्यवंशी व होमगार्ड 8427 /निकम यांना त्यांच्या डोळ्यावर स्प्रे मारल्यामुळे त्रास होऊ लागल्याने उपचारा कामी कृष्णा हॉस्पिटल,  कराड येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती उपचार चालू आहेत.आम्ही हॉस्पीटलला जाऊन परिस्थीती पाहून डॉक्टर बोलावून घेतले असून कर्मचार्‍यांवर उपचार चालू केले आहेत. आता सर्वांची प्रकृती स्थीर झाली आहे.रात्रपाळी अधिकारी WAPI सौ. शादिवान यांची फिर्याद घेवून भादंवि कलम ४५८, ३५३, ३३२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करीत आहे. तपास API श्री. गोडसे यांचेकडे देत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त