अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीस बिहारमधून परत आणले, लोणंद पोलीसांची मोठी कामगीरी
मंगेश माने
- Thu 28th Mar 2024 11:33 am
- बातमी शेयर करा
लोणंद- पोलिसांनी एका अल्पवयीन अपहृत मुलीची बिहार राज्यात जावून शोध घेत अल्पवयीन मुलीसह आरोपीला परत आणण्यात यश मिळवले
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळज ,बडेखान, ता फलटण जिल्हा सातारा येथील चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाल्याची तक्रार लोणंद पोलीसात दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदर मुलगी बिहार राज्यात असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी निष्पन्न केल्यानंतर पिडीत मुलगी ही बिहार राज्यात आरोपी गणेश माणिक अवघडे रा. गोंदवले ता. माण जि. सातारा सध्या रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे याचे सोबत असलेबाबत माहीती मिळाल्याने जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिक्षक राहुल धस यांची परवानगी घेऊन पोहवा सर्जेराव सुळ , पोकॉ. केतन लाळगे मपोकॉ. रुतुजा शिंदे यांचे पथक बिहार राज्यात पाठवण्यात आले. त्यांना सपोनि सुशिल भोसले व पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत शोध घेवून पिडीत मुलगी ही दिनांक 24 रोजी दुपारी 12.00 वाजता आरोपी गणेश माणिक अवघडे याचेसह मिळुन आली. पिडीत मुलीस व आरोपीस बिहार येथुन डोळ्यात तेल घालुन तपास पथक यांनी लोणंद पोलीस स्टेशन येथे आणुन तपासी अधिकारी पोउनि विशाल कदम यांचे ताब्यात सुखरुप आणून दिले. लोणंद पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगीरीबाबत सर्व स्तरातून कौतुकाची थाप मिळत आहे. तसेच वरिष्ठांनीही सदर कारवाईबाबत अधिकारी व अंमलदार यांची पाठ थोपटली आहे.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Thu 28th Mar 2024 11:33 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Thu 28th Mar 2024 11:33 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Thu 28th Mar 2024 11:33 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Thu 28th Mar 2024 11:33 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Thu 28th Mar 2024 11:33 am
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Thu 28th Mar 2024 11:33 am
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Thu 28th Mar 2024 11:33 am
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Thu 28th Mar 2024 11:33 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 28th Mar 2024 11:33 am
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 28th Mar 2024 11:33 am
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 28th Mar 2024 11:33 am
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 28th Mar 2024 11:33 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Thu 28th Mar 2024 11:33 am













