खंडाळा तालुक्यातील सांगवी व शिरवळ येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

शिरवळ  : खंडाळा तालुक्यात दोन गटात कोयता लोखंडी गुप्ती पिस्टल व लोखंडी गजाचा वापर दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून परस्परांच्या विरोधात शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे


याबाबत शिरवळ पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार शिरवळ पोलिस स्टेशनच्या सांगवी गावच्या हद्दीत असणाऱ्या एका बारमध्ये अय्याज इकबाल शेख, म मिनाज इकबाल शेख (रा. शिरवळ) व अन्य दोघे असे चार युवक आले. दरम्यान, बारमधील कर्मचारी संकेत सुरेश कदम (मूळ रा. लोणी, ता. खंडाळा, जि. सातारा, सध्या रा. शिरवळ) याने संबंधितांना दारुच्या बाटलीचे पैसे मागितले. यावर चिडून या चौघांनी काउंटर व टेबलवर कोयता मारून शिवीगाळ केली तसेच आतमध्ये येऊन संकेतला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.या मारहाणीत अय्याज शेख याने संकेतच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली व रियाज शेख याने खिशातील १५ हजार रुपये काढले, दुकानाच्या काचा कोयत्याने फोडून दुकानाचेही नुकसान केले, अशी तक्रार करून याप्रकरणी संकेत कदम याने दिलेल्या फिर्यादीवरून मिनाज इकबाल शेख, अय्याज इकबाल शेख व अन्य दोन अनोळखी युवक अशा चौघांवर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार करीत आहेत.

तर परस्परविरोधी रियाज शेख याने दिलेल्या तक्रारीनुसार बारमध्ये वे झालेल्या वादानंतर दि. ३० रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास अय्याज शेख व बारियाज शेख हे दोघे शिरवळ येथील व ट्यूब कंपनीलगत असणाऱ्या त्यांच्या जागेमध्ये येऊन थांबले होते. यावेळी चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी गुप्ती, पिस्टल व लोखंडी रॉडने शेखभावंडांवर हल्ला चढवला. या मारहाणीमध्ये अय्याज व रियाज शेख या दोघांना जबरी मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या ठिकाणी उपस्थित असणारे शाहरुख खान व कुमार मस्के हे देखील मारहाणीत किरकोळ जखमी झाले.याप्रकरणी मिनाज उर्फ रियाज शेख याने शिरवळ पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल शेख (रा.बावडा, ता. खंडाळा), विक्रम मोहिते (सध्या रा. शिरवळ), रोहित सुर्वे व अमित उर्फ बिऱ्या कदम (दोघे रा. लोणी ता. खंडाळा), बाबू गोळे (रा. सांगवी ता. खंडाळा) या पाच युवकांवर शिरवळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे अधिक तपास करत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त