पालखी मार्गाची आयजी सुनील फुलारी यांच्याकडून पाहणी

सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना कोणतीही अडचणी येणार नाही अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे . पालखी सोहळा व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलीस खात्याच्या वतीने नियोजन केले जात आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली .
  ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पालखी मार्ग पालखी तळ नीरा दत्त घाट आदी ठिकाणांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी सुनील फुलारी बोलत होते . पाहणी वेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख , अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख बापू बांगर , होमडीवायएसपी विजय पाटील , पोलीस उपाधीक्षक राहुल दस सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
सुनील फुलारी यांनी निरा दत्त गटाचे पाणी करताना माऊलींच्या पालखी सोहळ्या दरम्यानच्या निरास्नानाची ठिकाणाची पाहणी केली . या ठिकाणी गर्दी, गडबड, गोंधळ होणार नाही या दृष्टीने पोलीस बंदोबस्त लावण्याच्या सूचना केल्या .पाडेगाव ते लोणंद या पालखी मार्गाची ही त्यांनी पाहणी केली यादरम्यान वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याची सुचना केली. लोणंदच्या पालखीतळाला भेट देऊन दर्शन रांगा, माउलींचा ओटा, पालखी तळावरील बंदोबस्ताबाबत सूचना त्यांनी दिल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त