शिरवळ पोलीसांकडून विनयभंगाचा गुन्हा ३ तासात उघड
Satara News Team
- Thu 29th May 2025 02:26 pm
- बातमी शेयर करा
शिरवळ : शिरवळ येथे दुचाकीवरुन येत महिलेच्या अंगाला स्पर्श करत अश्लील हावभाव करून विनयभंग केल्याप्रकरणी संशयित शुभम दिलीप गुळमे (वय २४ वर्षे, व्यवसाय नोकरी, सध्या रा. शिर्के कॉलनी शिरवळ, ता.खंडाळा, जि. सातारा, मुळ रा. माळवाडी, पोस्ट लाटे, ता. बारामती, जि.पुणे) याला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडील दुचाकीदेखील पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता. खंडाळा गावातील साई सुपार मार्केट जवळ कच्चा रोडवर संशयित शुभम दिलीप गुळमे हा त्याच्या स्प्लेंडर मोटर सायकल क्र. एम.एच.४२ ए.यु.६८७२ वरुन तोंडाला मास्क लावुन आला व गाडी स्लो करून एका हाताने फिर्यादीच्या छातीस हात लावला तसेच पुढे जावुन मोटर सायकल थांबवुन अश्लिल इशारे करत फिर्यादीचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले होते. याप्रकरणी संबंधित महिलेने शिरवळ पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, घडलेल्या घटनेची गंभीरता लक्षात घेवून पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे त्यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बाबी तपासत विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत शुभम दिलीप गुळमे यास ताब्यात घेत त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली. फिर्यादी महिलेने शुभम गुळमे व ती दुचाकी ओळखली.
आरोपी शुभम याने असेच कृत्य आणखी काही महिलांसोबत केले असलेचे नाकारता येत नाही. तरी याप्रकारचे कृत्य ज्या महिलांसोबत झाले असेल त्यांनी शिरवळ पोलीस ठाणे नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस उप निरीक्षक नयना कामथे मोबाईल नं.८१८०९५१६१७ व सपना दांगट मोबाईल नं. ९५४५६५०६०० यांचेशी संपर्क साधावा अथवा पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे मोबाईल क्रमांक- ९५८८६०९९११ व ९२२३००६१४५ यावर संपर्क करावा आपले नाव, पत्ता व इतर महिती गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन शिरवळ पोलिसांनी केले आहे. दाखल गुन्हयाचा तपास स. पो.फौ. विलास यादव करीत आहेत.
तसेच सर्व महिला माता भगिनी यांना शिरवळ पोलीस स्टेशन कडुन आवाहन करण्यात येते की, आपणास येता-जाता मारक किंवा हेल्मेट घातलेले संशयीत येता-जाता दिसल्यावर किंवा इतर महिले सोबत अश्लिल कृत्य करीत असल्याचे निदर्शनासं आलेस तात्काळ त्या वाहनाचा क्रमांक मोबाईल मध्ये फोटो कढुन त्याची माहिती वर नमुद दिलेले मोबाईल क्रमांकावर कळवावी जेणेकरुन याप्रकारचे अश्लिल कृंत्यास आळा बसणेस पोलीसांना सहकार्य होईल.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 29th May 2025 02:26 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 29th May 2025 02:26 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Thu 29th May 2025 02:26 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Thu 29th May 2025 02:26 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 29th May 2025 02:26 pm
संबंधित बातम्या
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Thu 29th May 2025 02:26 pm
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Thu 29th May 2025 02:26 pm
-
चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
- Thu 29th May 2025 02:26 pm
-
घरगुती वादातून दिराने केला वहिनीचा विनयभंग !
- Thu 29th May 2025 02:26 pm
-
औंध पोलीस ठाण्यातील सायबर आणि क्राईम विभागाची उल्लेखनीय कामगिरी.
- Thu 29th May 2025 02:26 pm
-
फलटणमध्ये पोलिसांसमोरच हवेत गोळीबार; एकजण ताब्यात, एक फरार
- Thu 29th May 2025 02:26 pm
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Thu 29th May 2025 02:26 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Thu 29th May 2025 02:26 pm













