खंबाटकी घाटात विवाहितेचा मृतदेह , घात की अपघात चर्चेला उधाण
Satara News Team
- Wed 27th Nov 2024 11:15 am
- बातमी शेयर करा
पुणे-बंगलोर : राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीत अंदाजे 28 ते 30 वयाच्या एका विवाहित युवतीचा मृतदेह आढळून आला आहे.संबंधित युवतीचा घात की अपघात याबाबत चर्चेला उधाण आले असून अन्य ठिकाणी घातपात करीत सेफ झोन मानल्या गेलेल्या डंपिंग ग्राऊंड अर्थात खंबाटकी घाटामध्ये मृतदेह टाकून देण्यात आल्याची शक्यता खंडाळा पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.
बेंगरुटवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत खंबाटकी घाटातील एक वळणालगत एक मालट्रक बंद पडल्याने संबंधित मालट्रकवरील चालक हे मालट्रक दुरुस्त करीत असताना व त्याठिकाणी दुरुस्तीकरीता यंञज्ञ येण्यासाठी उशिर लागणार असल्याने चालक कठड्याच्या बाजूला उग्र वास आल्याने चालकाचे खंबाटकी घाटातील दरीत लक्ष गेल्याने त्याठिकाणी एक महिलेचा मृतदेह दिसून आला असता तत्काळ खंडाळा पोलीसांशी संपर्क साधला.यावेळी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके,सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के व खंडाळा पोलीस,शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्याने मृतदेह दरीतून काढत खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
यावेळी घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक डाँ.वैशाली कडूकर,फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने भेट देत पाहणी केली,यावेळी संबंधित विवाहित युवतीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने पाच ते सहा वार केले असल्याचे स्पष्ट झाले असून वार वर्मी बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत खंडाळा पोलीस स्टेशनला सुरु होते.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल शेळके हे करीत आहे
#crime
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 27th Nov 2024 11:15 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 27th Nov 2024 11:15 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 27th Nov 2024 11:15 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Wed 27th Nov 2024 11:15 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Wed 27th Nov 2024 11:15 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Wed 27th Nov 2024 11:15 am
संबंधित बातम्या
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 27th Nov 2024 11:15 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Wed 27th Nov 2024 11:15 am
-
औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?
- Wed 27th Nov 2024 11:15 am
-
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Wed 27th Nov 2024 11:15 am
-
राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
- Wed 27th Nov 2024 11:15 am
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Wed 27th Nov 2024 11:15 am
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Wed 27th Nov 2024 11:15 am
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Wed 27th Nov 2024 11:15 am












