अभिनेत्री व दिग्दर्शिका श्वेता शिंदे यांच्या पिरवाडी येथील घरामध्ये चोरी.
Satara News Team
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
- बातमी शेयर करा
सातारा : लागीर झालं जी या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री व दिग्दर्शिका श्वेता शिंदे यांच्या पिरवाडी येथील घरामध्ये 4 जून रोजी मध्यरात्री चोरी झाली होती. या चोरीमध्ये नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख अज्ञाताने लांबवले. खिडकीचे गज कापून ही चोरी करण्यात आली होती. यासंदर्भात सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहेत. या फुटेज मधील संशयिताचा कसून शोध घेतला जात आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी स्वतः गुरुवारी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन सखोल तपासाची मागणी केली.
श्वेता शिंदे यांच्या मातोश्री आपल्या मुलीला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. पिरवाडी परिसरात त्यांचा बंगला आहे. बंद बंगल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून नऊ तोळे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. खिडकीचे गज कापून ही चोरी करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बेडरूममधील लाकडी कपाटाची तिजोरी फोडण्यासाठी ती पेटवून देण्यात आली. बंगल्याच्या सफाईसाठी असणार्या नोकराच्या ही चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती अभिनेत्री श्वेता शिंदे यांना फोन करून दिली.
त्यामुळे सौ. शिंदे आपल्या आईसह तात्काळ सातार्यात दाखल झाल्या. या चोरी संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरू केला आहे. याबाबत पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज मिळालेले आहे. यामध्ये काळे जॅकेट व निळी जीन्स व पांढरे बूट घातलेला एक संशयित दिसून येत आहे. तपासाचा तो धागा पकडून पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
संबंधित बातम्या
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Thu 6th Jun 2024 10:15 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Thu 6th Jun 2024 10:15 pm












