मायणी ग्रामसभेत राडा :सत्ताधाऱ्यांची बघून घेण्याची भाषा

सामाजिक कार्यकर्त्यांची अनावश्यक खर्च करण्यात आलेल्या खर्चासंबंधी प्रश्न विचारणा

मायणी :  मायणी येथे नुकतीच ग्रामसभा संपन्न झाली. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात घनकचऱ्या साठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यासाठी अनावश्यक खर्च करण्यात आलेल्या खर्चासंबंधी प्रश्न विचारला. यावर मायणी ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटाने यावर उत्तर देणे अपेक्षित असताना . ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या समोरच " संबंधित"  प्रश्न अनुत्तरित ठेऊन प्रश्न विचारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला बघून घेण्याची भाषा करण्यात आली.  यानंतर ग्रामसभेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने ग्रामसभा गुंडाळण्याची नामुष्की ग्रामविकास अधिकाऱ्यांवर आली.


                      कोणत्याची गावची ग्रामसभा नागरिकांच्या अधिकाराचा एक भाग आहे. गावात निर्माण होणाऱ्या सार्वजनिक गैर सोईविषयी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करणे हा गावातील नागरिकाचा हक्क आहे. मायणी ग्रामपंचायतीकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी काही हजाराचा निधी खर्च करण्यात आला. यासंबंधी हा खर्च अनाठायी असून संबंधित खड्डा आम्हाला दाखवा. त्याचा वापर चालू आहे का? हे सर्वांसमोर स्पष्ट करण्यात यावे असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिवसेनेचे मायणी विभाग प्रमुख. व सामजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण यांनी ग्रामसभेत उपस्थित केला. 
                      यावर सत्ताधारी पक्षाने विरोधात आलेला हा प्रश्न पाहून यावर उत्तर देण्याचे टाळून विशाल चव्हाण यांना आमच्यावर सातत्याने तु तक्रारी करत आहेत. तुला बघुन घेतो . असा सज्जड दिला. 
                       त्याअगोदर ग्रामसभेत योग्य शिष्टाचार पाळण्यात येत नसल्यासंबंधी चव्हाण यांची प्रश्न उपस्थित केला होता. महिला ग्रामपंचायत सदस्य असताना. त्यांचे पती पदावर नसतानाही अध्यक्षाच्या शेजारी स्थानापन्न झालेले पहावयास मिळाले होते.  यासंबंधी चव्हाण यांनी ग्रामसभेत जाब विचारला . याचाच राग मनात धरून सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण. यांना सत्तेतील प्रमुख ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी 
 मस्तीआलीका अशी दमाची भाषा करून ग्रामस्थांच्या अधिकाराची पायमल्ली करण्यात आली यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित बिडीओ, व ग्रामविकास अधिकाऱ्याना यासंबंधी खुलासा मागणे आवश्यक आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त