यवतेश्वर घाटात धोकादायक दरड कोसळण्याच्या स्थितीत,

सातारा : जिल्हयात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पूर्वेस पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेस पावसाची संततधार सुरुच आहे. यामुळे घाटात दरड कोसळण्याचा धोका असून यवतेश्वर घाटात काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास महाकाय दगड रस्त्यावर आदळला होता. घाटात अजूनही काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. घाटातील एकेठिकाणी धोकादायक सुळका डोंगरापासून निसटण्याच्या स्थितीत आहे. ती लवकरात लवकर काढण्याची गरज निर्माण झाली आहे. 

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाधिकारी रविकुमार आंबेकर यांनी सांगितले की,  दुर्घटना टाळण्यासाठी बांधकाम विभागाच्यावतीने घाटातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. याबाबत अहवाल लवकरच पाठविण्यात येणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त