नगरसेवक अनुप शहा यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली फाउंडेशन फलटण यांच्यातर्फे तीर्थयात्रेचे आयोजन

नगरसेवक अनुप शहा यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली फाउंडेशन फलटण यांनी महानुभाव पंथीय साधू पुजारी उपदेशी यांच्यासाठी तीर्थयात्रेचे यशस्वी आयोजन केले शुक्रवार दिनांक 10 रोजी रात्री एक वाजता तपस्विनी मंगल ताई पंजाबी तपस्विनी जयाताई विध्वंस यात्रा संयोजक समिती सदस्य रमेश मठपती दिलीपराव मठपती अजित मठपती गणेश मठपती पितांबर भोसले यांनी गाडीचे पूजन करून यात्रेचा शुभारंभ केला एका लक्झरी बस मध्ये 42 लोकांना घेऊन यात्रा सुरू झाली पहाटे पाच वाजता नागापूर येथे दर्शन घेऊन यात्रा बेलापूर डोमीग्राम फुलंब्री निल्लोड मार्गे दर्शन घेत जाळीचा देव येथे आंबेगावकर बाबांच्या आश्रम मध्ये मुक्कामास पोचली जाईचा देव पुजारी संघाचे वतीने अनुप शहा यांचा सत्कार करण्यात आला सकाळी धार्मिक विधी देवदर्शन घेऊन यात्रा वॉलसांगवी तपोवन वासरूळ मार्गे जालना दर्शन करून पांचाळेश्वर येथे मुक्कामी पोचली सकाळी उठून सर्व धार्मिक विधी करून गेवराई बीड लिंबागणेश रामदारा येथे दर्शन घेऊन यात्रा फलटण येथे पोहोचली सदर यात्रेचे आयोजन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अनुप शहा यांनी माऊली फाउंडेशन च्या वतीने केले होते यात्रेमध्ये 42 लोकांना सहभागी करून घेतले गेले यात्रा यशस्वी करण्यासाठी रमेश मठपती गणेश मठपती दिलीप गणपती अजित मठपती पितांबर भोसले संगीता भोसले हरीपाल मेहकरकर यांनी विशेष परिश्रम घेतले यात्रेमध्ये महंत श्री शारंगधर बाबा केशवराज लांडगे यांनी उपस्थित राहून सर्व स्थानांची धार्मिक माहिती देऊन ठिकठिकाणी धर्म उपदेश केला यात्रा यशस्वी करण्यासाठी कवीश्वर कुलाचार्य शामसुंदर शास्त्री विध्वंस कापूसतळणीकर बाबा महेंद्र मुनी बिडकर भरत शेठ विध्वंस गोविंदराज लांडगे हरीपाल शास्त्री विध्वंस श्याम बाबा जामोदेकर अभि दादा सिन्नरकर अमित राज कपाटे कृष्णराज लासुरकर ते विशेष सहकार्य लाभले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त