बांधकामाचे साहित्य चोरणारे तीघे बोरगाव पोलिसांच्या ताब्यात

देशमुखनगर : सातारा तालुक्यातील माजगाव गावच्या कुंभारकी नावाच्या शिवारातील ओढ्यावरील साखळी काँक्रीट बंधाऱ्याच्या कामावरील 63 हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरी प्रकरणी बोरगाव पोलिसांनी रामचंद्र दत्तू घाडगे (मूळ राहणार मसवड सध्या राहणार आंबेवाडी),  गोवाराम नेवाराम राबारी (मूळ राहणार राजस्थान सध्या राहणार देशमुख नगर),  अनिल हनुमंत बर्गे (राहणार आंबेवाडी) या तीन संशयितांना ताब्यात घेतले. 
    याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती, दिनांक 17 रोजी भरत निवृत्ती देशमुख यांनी फिर्याद नोंदवली होती. उपअधीक्षक राजीव नवले व सपोनी रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकातील अंमलदार दादा स्वामी, प्रशांत चव्हाण, केतन जाधव, अमोल सपकाळ, विजय म्हेत्रे यांनी गोपनीय माहिती मिळवली, त्यावेळी या साखळी बंधाऱ्याच्या कामावरील सुपरवायझर व संशयित रामचंद्र घाडगे यास ताब्यात घेतले, त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली तसेच चोरीत गोवाराम राबारी व अनिल बर्गे हे संशयित सोबत असल्याचे सांगितले, त्यावरून सर्व संशयितांना   मुद्देमालासह अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता अनिल घाडगे याला न्यायालयीन कोठडी मिळाली. या गुन्ह्याचा तपास हवालदार अमोल सपकाळ करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त