पोलीस अधीक्षकांना आली भोवळ

वारीच्या बंदोबस्तादरम्यान घडली घटना

सातारा : पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना वारीमध्ये अचानक भोवळ आली. यानंतर त्यांना सहकाऱ्यांनी खुर्ची बसायला दिल्यानंतर पाणी दिले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली.
फलटण येथे आज, शनिवारी दुपारी वारीच्या बंदोबस्तासाठी स्वत: पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे गेले होते. त्यावेळी अचानक त्यांना भोवळ आली. ते खाली बसले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनी तातडीने त्यांना खुर्ची बसायला देऊन पाणी दिले. अधीक्षक बन्सल यांना भोवळ आल्याचे समजताच सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते याही तेथे आल्या. थोडावेळ खुर्चीवर बसल्यानंतर बन्सल यांना बरे वाटू लागले.
अनेकांनी त्यांना तुम्ही विश्रांती घ्या, असा सल्ला दिला. मात्र आजचा बंदोबस्त महत्वाचा असल्याने मी इथून जाणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यांना बरे वाटू लागल्यानंतर ते पुन्हा बंदोबस्तामध्ये मग्न झाले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त