४० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या कराड येथील तलाठ्यावर गुन्हा

सातारा : ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्त करण्यासाठी  ४० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या कराड, ता. कराड येथील तलाठी सागर दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी केलेल्या सर्व्हे नंबर ३४८/३ या प्लॉटवर तक्रार व त्यांच्या नातेवाईकांचे ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्त करण्यासाठी तलाठी पाटील यांनी त्यांच्याकडे चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार यांनी सातारा येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यात तर्थ आढळल्याने तलाठी सागर दत्तात्रय पाटील याच्यावर
 कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला