साताऱ्यात गुंड दत्ता जाधवसह २२ सराईत गुन्हेगारांच्या घरावर फिरवला बुलडोझर, जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई
Satara News Team
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शहरालगत असलेल्या प्रतापसिंह नगरातील गुंड दत्ता जाधव याच्यासह २२ सराईत गुन्हेगारांच्या घरावर बुधवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने बुलडोझर फिरविला. प्रतापसिंह नगरातील गुन्हेगारी कायमची मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.
शहरालगत असलेले प्रतापसिंहनगर गुन्हेगारी आणि गुंडगिरीसाठी ओळखले जाते. या प्रतापसिंहनगरातून सातत्याने गुन्हेगारी कारवाया होत असतात. याच नगरात राहणारा गुंड दत्ता जाधव याची दहशत प्रचंड होती. खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे गुंड दत्ता जाधव याच्यावर दाखल आहेत. सध्या तो मोक्का कारवाईअंतर्गत कारागृहात आहे. गेल्या आठवड्यात गुंड दत्ता जाधव याचा मुलगा अजय उर्फ लल्लन जाधव याने एका तरूणीच्या घरात घुसून तिच्यावर तलवारीने वार केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा प्रतापसिंहनगर चर्चेत आले. गुन्हेगारीच्या वरदहस्तामुळे तेथील गुंडांनी जागा बळकावून टोलेजंग इमारती बांधल्या होत्या. प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारी होत्या. मात्र, आत्तापर्यंत ठोस कारवाई केली जात नव्हती.
प्रतापसिंह नगरातील वाढती गुन्हेगारी सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पुढे आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गुंडांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय घेतला. तब्बल २२ गुन्हेगारांची यादी तयार करून प्रशासन बुधवारी सकाळी प्रतापसिंह नगरात बुलडोझर घेऊन पोहोचले. संबंधित २२ गुन्हेगारांची घरे शोधून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यास सुरूवात केली. दुपारी बारापर्यंत ११ घरावर बुलडोझर फिरविण्यात आला. ही कारवाई दिवसभर सुरू राहणार आहे. २२ गुन्हेगारांची घरे भुईसपाट केली जाणार आहेत. या कारवाईसाठी जिल्हा पोलिस दलाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 27th Mar 2024 12:26 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Wed 27th Mar 2024 12:26 pm













