गावच्या यात्रेत देशी बनावटीचे पिस्तूल हातात घेऊन फिरणे पडले महागात
Satara News Team
- Mon 27th May 2024 09:00 pm
- बातमी शेयर करा
कराड : कराड तालुक्यातील कोरेगाव येथे गावच्या यात्रेत एकजण चक्क देशी बनावटीचे पिस्तूल हातात घेऊन फिरत होता… एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रकार सुरू असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना लागली अन् स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तो जोरबंद केला
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी लोकसभा निवडणुक प्रक्रिया २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर शस्त्रे व अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिलेल्या होत्या व त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते.
कोरेगांव, ता. कराड येथे गांवचे वार्षीक यात्रेमध्ये जमलेल्या गर्दीमध्ये एक युवक हातात पिस्टल घेवून वावरत असलेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना खास खबऱ्याकडून मिळाली.. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी सुचना देवून मौजे कोरेगांव, ता. कराड या गांवचे परिसरात गस्त घालून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार दिनांक २५ मे २०२४ रोजी रात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाने कराड जवळच्या कार्वे तसेच कोरेगांव परिसरात गस्त सुरू ठेवली होती. यादरम्यान , खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीशी मिळताजुळता एक संशयित युवक कोरेगांव बाजूकडून येणारे रस्त्याने पायी चालत येत असताना दिसला. त्याचा संशय आलेने त्यास ताब्यात घेवून पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात ७० हजार रुपये किंमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस किंमत असा एकुण ७० हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याचे ताब्यात मिळून आला. त्यामुळे त्या युवकाविरुध्द कराड तालुका पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फाणें, पोउनि, विश्वास शिंगाडे, तानाजी माने, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर, पो.हवा. विजय कांबळे, संजय शिर्के, अतीश घाडगे, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, धिरज महाडीक, मोहसीन मोमीन, अमृत करपे, दलजितसिंह जगदाळे, विजय निकम, तसेच कराड तालुका पोलीस ठाणे कडील स.पो.नि. अभिजीत चौधरी, पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, सज्जन जगताप, धनंजय कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उप अधीक्षक अतुल सबनीस , यांनी अभिनंदन केल आहे.
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Mon 27th May 2024 09:00 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Mon 27th May 2024 09:00 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Mon 27th May 2024 09:00 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Mon 27th May 2024 09:00 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Mon 27th May 2024 09:00 pm
संबंधित बातम्या
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Mon 27th May 2024 09:00 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Mon 27th May 2024 09:00 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 27th May 2024 09:00 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 27th May 2024 09:00 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 27th May 2024 09:00 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Mon 27th May 2024 09:00 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Mon 27th May 2024 09:00 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Mon 27th May 2024 09:00 pm













