जावळीतील पवारवाडी खूनप्रकरणी आठ जणांवर गुन्हा.
पवारवाडी, ता. जावली येथील एका युवकाला मारहाण करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूतSatara News Team
- Sat 10th Jun 2023 09:59 am
- बातमी शेयर करा
जावली : पवारवाडी, ता. जावली येथील एका युवकाला मारहाण करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विरमाडे येथील आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गणेश बजरंग सोनवणे, सुमित जालिंदर सोनवणे, प्रथमेश जयवंत सोनवणे, अभिषेक शिवाजी सोनवणे, प्रकाश शामराव पाटील, अक्षय कमलाकर सोनवणे (सर्व रा. विरमाडे ता. वाई) अशी पोलिसांनी अटककेलेल्यांची नावे आहेत. सुरज प्रदीप शिंदे, (रा. पवारवाडी, ता. जावली असे मृत झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी सुरेश मच्छिंद्र पवार (रा. पवारवाडी, ता. जावली) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश पवार यांचा भाचा सुरज शिंदे याला मारहाण झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. कुणाल दिलीप गायकवाड, सुशांत उर्फ प्रणव सुनील सोनवणे हे दोन संशयित पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या सहा जणांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. तपास सपोनि तासगावकर यांच्यामार्गदर्शनाखाली सुरु आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 10th Jun 2023 09:59 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 10th Jun 2023 09:59 am
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sat 10th Jun 2023 09:59 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 10th Jun 2023 09:59 am
संबंधित बातम्या
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Sat 10th Jun 2023 09:59 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 10th Jun 2023 09:59 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Sat 10th Jun 2023 09:59 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Sat 10th Jun 2023 09:59 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Sat 10th Jun 2023 09:59 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Sat 10th Jun 2023 09:59 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Sat 10th Jun 2023 09:59 am
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Sat 10th Jun 2023 09:59 am












