१७ वर्षीय तरुणावर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल

सातारा : एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीचा पाठलाग करून ‘मला तुझ्याशी बोलायचंय,’ असं म्हणून तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका १७ वर्षीय तरुणावर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर २०२२ पासून वेळोवेळी घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १६ वर्षांची असून, १७ वर्षीय तरुण हा तिच्या शाळेजवळ जाऊन ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू मला खूप आवडतेस,’ असे म्हणून तिचा वारंवार विनयभंग करत होता. तसेच तिच्याशी जवळीक करता यावी, यासाठी तिच्या घरापर्यंत वारंवार त्याने पाठलाग केला. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर मुलीच्या आईने संबंधित तरुणाला समजावून सांगितले. मात्र, तरी सुद्धा तो मुलीला घराजवळ थांबवून बोलण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार सुद्धा मुलीने घरी सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने दि. १७ रोजी रात्री साडेनऊ वाजता शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक सतीश साबळे हे अधिक तपास करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला