जबरीने मारहाण करुन रोकड लुटणारी अट्टल टोळी 12 तासाच्या आत जेरबंद

हत्यार व रोकड असा मुद्देमाल हस्तगत

उंब्रज:मसूर रेल्वे गेटवर आरडाओरडा करून दहशत माजविणाऱ्या तिघाजणांना पेट्रोलिंग करणाऱ्या सपोनि अजय गोरड यांनी 12 तासाच्या आत अटक करून गुन्हा दाखल केला. या प्रशासनीय कामगिरीबद्दल अजय गोरड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.15 ते 6.45 च्या सुमारास मसूर रेल्वे गेटवर सिक्युरिटी गार्डचे काम करणाऱ्या सुरज प्रल्हाद कांबीरे रा. कांबीरवाडी ता कराड यांनी रेल्वे गेटलगत कार उभी करून व मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत माजवत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तिघांना हटकले म्हणून त्या तिघांनी त्यांचेवर चाकू व कोयत्याने हल्ला करून कारसह पळून गेले.  याची खबर मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत पेट्रोलिंग करत असलेले उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांनी सदर गाडीच्या दिशेने पाठलाग केला. पोलीस गाडी पाटलाग करत असल्याचे पाहून आरोपींनी कार उभी करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तिघांनाही पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली. शाहीन उर्फ सोन्या शब्बीर मुल्ला (वय 25) व शाहरुख शबीर मुल्ला (वय 26) दोघेही रा. कोणेगाव ता. कराड व अमित अंकुशराव यादव  (वय 26) रा कवठे,ता. कराड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी एकास दोन वेळा सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. त्याची तडीपारी संपल्याने तो नव्याने टोळी करून भागात दहशत माजविण्याचे तो काम करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व कारसह रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना कराडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि अजय गोरड, चालक पो. हे. सचिन देशमुख,  स्वप्निल मोरे, अभिजीत पाटील, गौरव खवळे यांनी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील व अंमलदार अभिजीत पाटील करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त