35 वर्षीय नरधमाने 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार.
Kuldeep Mohete
- Sat 31st May 2025 08:50 am
- बातमी शेयर करा
पाटण : ढेबेवाडी विभागातील एका गावात 35 वर्षीय नरधमाने 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून याबाबत कोणाला सांगू नको, नाही तर जिवे मारीन, अशी धमकी त्या मुलीला दिली.
यासंदर्भात ढेबेवाडी पोलिस ठाण्यात संशयितावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढेबेवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विभागातील डोंगर पठारावरील एका गावात गुरुवार, दि. 28 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या आईला फोन करण्यासाठी गावातील आत्याच्या घराजवळ आली होती. यावेळी आत्याच्या 35 वर्षीय मुलाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मुलीला मोबाईल बघण्याच्या निमित्ताने जवळ बोलावून घेतले व तिच्यावर अत्याचार केला.
ही बाब कोणाला सांगायची नाही, जर सांगितलीस तर जिवे मारीन, अशी धमकी दिली. आई घरी आल्यानंतर घाबरलेल्या मुलीने ही हकीकत सांगितली. याबाबत आईने ढेबेवाडी पोलिस ठाण्यात संशयित नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, ढेबेवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास स.पो.नि. प्रवीण दाईंगडे करत आहेत
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Sat 31st May 2025 08:50 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sat 31st May 2025 08:50 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sat 31st May 2025 08:50 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sat 31st May 2025 08:50 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 31st May 2025 08:50 am
संबंधित बातम्या
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Sat 31st May 2025 08:50 am
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Sat 31st May 2025 08:50 am
-
चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
- Sat 31st May 2025 08:50 am
-
घरगुती वादातून दिराने केला वहिनीचा विनयभंग !
- Sat 31st May 2025 08:50 am
-
औंध पोलीस ठाण्यातील सायबर आणि क्राईम विभागाची उल्लेखनीय कामगिरी.
- Sat 31st May 2025 08:50 am
-
फलटणमध्ये पोलिसांसमोरच हवेत गोळीबार; एकजण ताब्यात, एक फरार
- Sat 31st May 2025 08:50 am
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Sat 31st May 2025 08:50 am
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Sat 31st May 2025 08:50 am













