75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
Satara News Team
- Fri 6th Jun 2025 09:57 am
- बातमी शेयर करा
मंडलाधिकार्याकडून राजरोस मागणी मंडलाधिकार्याने तक्रारदारांना चालू दस्त, सात-बारावरील सर्व कागदपत्रे व नोंद करण्याबाबतचा अर्ज खिंडवाडी तलाठी कार्यालयात जमा करण्यास सांगितले. सात-बाराची नोंद घ्यायचे काम माझे. तलाठी कार्यालयातील नोंद व नोंदीवरून फेरफार उतारा चौकशी करून सात-बारावर तुमचे नाव लावण्याची जबाबदारी माझी, असे म्हणत घाडगे याने तक्रारदारांना तुम्ही फक्त मला 1 लाख रुपये पोहोच करा, असे सांगितले.
सातारा : सात-बाराची नोंद करून देण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत त्यापैकी 75 हजार रुपये स्वीकारताना कोडोली (ता. सातारा) येथील तत्कालीन मंडलाधिकारी अजित दादासाहेब घाडगे (वय 48, रा. वनवासवाडी ता. सातारा) याला अटक केली.
याप्रकरणातील तक्रारदार हे खिंडवाडी (ता. सातारा) येथील एका गटातील शेतजमिनीच्या दस्तामधील लिहून घेणारे यांच्या वतीने कुलमुखत्यार आहेत. हा दस्त 60 गुंठेचा आहे. मूळ मालकांनी लिहून घेणार यांचे नाव सात-बारावर न लागल्याचा फायदा घेऊन विक्री केलेल्या 60 गुंठ्यापैकी 13 गुंठे जमिनीची पुन्हा दुसर्यांदा विक्री केली आहे. यानंतर 2024 मध्ये मूळ मालकांनी पुन्हा उर्वरित 47 गुंठ्यांपैकी आणखी 10 गुंठे जमीन पुन्हा विक्री केली. त्यावरून तलाठी खिंडवाडी यांनी 10 गुंठे जमिनीची नोंद सात-बारावर धरली. यामुळे तक्रारदार यांनी मंडलाधिकारी कोडोली यांच्याकडे कुलमुखत्यारदार या नात्याने आक्षेप नोंदवला. त्यावर मंडलाधिकारी कोडोली यांनी आक्षेपावरून सुनावणीअंती तक्रारदार यांचा आक्षेप मान्य केला व 10 गुंठे जमिनीच्या नोंदणीस स्थगिती दिली.
दि. 22 मे 2025 रोजी मंडलाधिकारी अजित घाडगे याने तक्रारदार यांना तुमच्या आक्षेपावरुन सदरचा फेरफार रद्द केला असल्याचे सांगितले. त्या कामाची व सातबारावरील उर्वरित 47 गुंठेे जमिनीची नोंद तुमच्या बाजूने करतो. यासाठी दोन्ही कामाचे मिळून 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. मंडलाधिकारी यांनी तक्रारदार यांना चालू दस्त, सातबारा वरील सर्व कागदपत्रे व नोंद करण्याबाबतचा अर्ज तलाठी कार्यालय खिंडवाडी यांच्या कार्यालयात जमा करण्यास सांगितले. सातबाराची नोंद घ्यायचे काम माझे, तुम्ही फक्त मला 1 लाख रुपये पोहोच करा. तलाठी कार्यालयातील नोंद व नोंदीवरुन फेरफार उतारा चौकशी करुन सातबारावर तुमचे नाव लावण्याची जबाबदारी माझी असे म्हणत घाडगे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपये लाच मागणी केली.
लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तक्रार केली. एसीबी विभागाने तक्रार घेवून पडताळणी केली. दि. 3 व 4 जून रोजी पडताळणी झाली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. 1 लाख रुपयांवरुन 75 हजार रुपये घेण्याचे ठरले. लाचेची रक्कम गुरुवारी दुपारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा लावला. रोख 75 हजार रुपये स्वीकारताना घाडगे याला एसीबी विभागाने रंगेहाथ पकडले. सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
स्थानिक बातम्या
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 6th Jun 2025 09:57 am
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Fri 6th Jun 2025 09:57 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 6th Jun 2025 09:57 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 6th Jun 2025 09:57 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 6th Jun 2025 09:57 am
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Fri 6th Jun 2025 09:57 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Fri 6th Jun 2025 09:57 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Fri 6th Jun 2025 09:57 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Fri 6th Jun 2025 09:57 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Fri 6th Jun 2025 09:57 am
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Fri 6th Jun 2025 09:57 am
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 6th Jun 2025 09:57 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Fri 6th Jun 2025 09:57 am













