हॉटेल नेशन 11, येथे गंभीर मारहाण करुन युवकाचे अपहरण करणाऱ्या पाचजणांच्या २४ तासात आवळल्या मुसक्या

सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून एका युवकास पट्टा, लाकडी दांडक्याने मारहाण घातक हत्याराने डोक्यात वार करुन गंभीर जखमी करुन त्याचे अपहरण केले. तसेच त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेवून पळून गेलेल्या चौघांसह एका अल्पवयीन मुलास सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शंतनु रामचंद्र पवार (वय 19), ॠषिकेश गणेश त्रिगुणी (वय 19), साहिल सतिश नलावडे वय 19), व क्षितिज संतोष पवार (वय 19, सर्व रा. मंगळवार पेठ सातारा) यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,शुक्रवार  दि. 1 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हॉटेल नेशन 11, आण्णासाहेब कल्याणी हायस्कूल ते विसावानाका रस्त्यावर आठजणांनी तक्रारदार युवकास तू आमच्या साथीदारास मारुन आमची खुन्नस काढतोस काय ? असे म्हणत त्या युवकाच्या डोक्यात घातक हत्याराने वार केला. तसेच इतरांनी पट्टा, लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्या युवकाला गंभीर जखमी केले. एवढे करुन न थांबता या आरोपींनी युवकाला मोटारसायकलवरुन जकातवाडी येथे त्याचे अपहरण केले. तिथे त्याच्या खिशातील रोख रक्कम काढून त्याला तिथेच टाकून संशयित आरोपींनी पोबारा केला होता. 

हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना या गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या होत्या. श्री. देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन आरोपींना ताब्यात घेण्यास सांगितले. तपास पथकाने गोपनीय माहिती काढून फरारी झालेल्या आरोपींचा ठावठिकाणा मिळवला आणि सापळे रचून सातारा व शहर परिसरातून मंगळवार पेठेतील या चार आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्याची कामगिरी बजावत साताऱ्यात असला प्रकार खपवून घेतला जाणार असा इशाराच गुन्हेगारी प्रवृत्तींना दिला आहे. 

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, लैलेश फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, मोहन पवार, विक्रम पिसाळ, ओंकार यादव, स्वप्निल कुंभार, अमित माने, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन  यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला