पांगारे येथील मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

सातारा: बहिणीची छेड काढू नकोस, असे समजावून सांगणार्‍या पांगारे (ता. सातारा) येथील युवकाच्या घरावर मे महिन्यात रात्री राजापुरी गावच्या 30 हून अधिक युवकांनी हल्ला केला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राहुल शिवाजी पवार (वय 28) या युवकाचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी आकाश आत्माराम मोरे, सुयोग जयसिंग गुरव, यश दीपक निकम, गजानन आनंदराव मोरे, तुषार शंकर साळुंखे, गणेश तात्याबा मोरे, जगदीश शंकर साळुंखे, प्रथमेश भाऊसो साळुंखे, प्रतीक सतीश साळुंखे, गणेश युवराज मोरे, संकल्प संजय साळुंखे, आविष्कार संजय साळुंखे (सर्व रा. राजापुरी, ता. सातारा) यांना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, पांगारे गावातील मुलगी ही राजापुरी शाळेतील इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. तिची राजापुरी गावातील गणेश युवराज मोरे वारंवार छेड काढत होता. यामुळे तिने भावाला याची कल्पना दिली. तेव्हा त्याने गणेश मोरे याला दोन वेळा समजावून सांगितले होते. मात्र, त्यावर गणेश मोरे आणि त्याच्या मित्रांनी पुन्हा धमक्या देणे सुरु केले. यावरूनच दि. 5 मे रोजी वाद झाला. त्या दिवशी मध्यरात्री 30 पेक्षा अधिक युवकांनी घरात घुसून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने राहुल पवार व नयन पवार यांना मारहाण केली. या हल्ल्यात राहुल पवार गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर पुण्यात उपचार सुरु असताना त्याचा शनिवारी मृत्यू झाला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त