क्रेन चोरटा मल्हारपेठ पोलीसांच्या ताब्यात
Satara News Team
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
- बातमी शेयर करा
पाटण : आज सकाळी ०८.३० वा. चे सुमारास मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले सो, पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके सो. सहा फौजदार प्रदिप साळवी, पो.हवा. संजय मोरे, होम प्रदिप निकम पेट्रोलींग ड्यूटी करत असताना मौजे मरळी ता. पाटण गावचे हदीमध्ये मरळी ते ढेबेवाडी जाणारे रोडवर सुतारमळा येथे टोइंग क्रेन क्र.एम.एच.०९ सी.ए.६३०६ ही उभी असल्याचे दिसली असता तेथे जावुन चौकशी केली संशयित आरोपीच्या हालचाली संशयास्पद दिसलेने त्यास जागीच पकडुन त्याचेकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यानंतर सदर संशयित आरोपीकडे अधिक चौकशी करता पोलीस ठाणेस आलेनंतर त्याचे ताब्यातील टोइंग क्रेन नं. एम.एच.०९ सी.ए.६३०६ किंमत अंदाजे ७०००००/-रू (सात लाख) किमतीची क्रेन कराड शहर येथुन चोरी केली असल्याचे कबुली दिली.आरोपीचे नाव रविंद्र विठ्ठल चोरगे असून वय २१ वर्षे, रा. चोरगेवाडी (कुंभारगाव), ता. पाटण, जि. सातारा
सदर टोइंग क्रेन ची कराड शहर पोलीस ठाणे कडुन अधिक माहिती घेतली असता कराड शहर पोलीस ठाणे गुन्हां रजि.नं. १२८७/२०२४ भा.न्या. संहिता. कलम.३०३ (२) दि.१९/०९/२०२४ रोजी गुन्हां दाखल झालेचे निष्पन्न झालेने सदर आरोपी व टोइंग क्रेन ही पुढील कारवाई करता कराड शहर पोलीसांचे ताब्यात दिले आहे.
ही कारवाई मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सो, सातारा.मा.विजय पाटील पोलीस उपअधिक्षक सो, पाटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले सो. पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके, सहा फौजदार प्रदिप साळवी, पो. हवा. संजय मोरे, होम .प्रदिप निकम यांनी केली.
स्थानिक बातम्या
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
संबंधित बातम्या
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Thu 19th Sep 2024 05:32 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Thu 19th Sep 2024 05:32 pm











