निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सातारा यांची बनावट दारु तयार करणा-या टोळीवर धडक कारवाई
Satara News Team
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
- बातमी शेयर करा
सातारा : मा.डॉ.विजय सुर्यवंशी, आयुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.सुनील चव्हाण संचालकसो, मा.विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क,कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षकसो, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाने दिनांक 05/11/2023 रोजी मौ.जुळेवाडी ता.कराड गावचे हद्दीत बनावट दारुची वाहतूक पकडून 1) रोहित रमेश सोळवंडे वय 26 वर्षे रा.कुंडल ता.पलूस जि.सांगली याच्या ताब्यातून बनावट देशी दारुचा साठा व एक चारचाकी वाहनासह एकूण 1,94,800/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर इसमास चौकशी कामी ताब्यात घेवून मौ.जुळेवाडी ता.कराड येथील देशी दारु दुकानाच्या पाठीमागे छापा टाकून 2) फैय्याज मुसा मुल्ला वय 53 वर्षे रा.मलकापूर ता.कराड जि.सातारा 3) शेखर गुणवंत बनसोडे वय 50 वर्षे रा. रा.रेठरे बु.ता.कराड जि.सातारा यांच्या ताब्यातून प्रथम दर्शनी बनावट दारुसाठा तसेच चारचाकी वाहनासह एकूण 1,40,480 /- किंमतीचा मुददेमाल जप्त केला. वरील तिन्ही आरोपींना सोबत घेवून मौ.मलकापूर ता.कराड गावचे हद्दीत ग्रीन लँड हॉटेलच्या पाठीमागे व मौजे रेठरे बु.ता.कराड जि.सातारा येथील कॅनॉल चौकी या परिसरातील मुलानकी नावाच्या शिवारात छापे टाकून आयाज आबू मुल्ला वय 53 वर्षे रा.रेठरे बु.ता.कराड जि.सातारा व इर्शाद उर्फ बारक्या शहाबुध्द्दीन मुल्ला वय 34 वर्षे रा. रा.रेठरे बु.ता.कराड जि.सातारा यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून बनावट दारुचा साठा तसेच बनावट दारु र्निर्मितीसाठी लागणारे साहित्य, कॅप सिलींग मशीन, बनावट लेबले, बनावट बुचे व इतर साहित्य असा चार ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये एकूण रुपये 19,12,010/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील इसमां विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65(अ)(ब) (क) (ड)(ई)(फ),81,82,83,90,103 नुसार गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आणि वरील सर्व आरोंपीना मा.कराड न्यायालया समोर हजर केले. तसेच मौ.जुळेवाडी ता.कराड येथील देशी दारु दुकान फैय्याज मुसा मुल्ला याने त्याच्या मालकीच्या देशी दारु दुकानात प्रथमदर्शनी बनावट दारुचा साठा विक्री करण्याच्या इराद्याने जवळ बाळगला म्हणून सदर देशी दारु दुकानावर सुदधा विभागीय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये सर्वश्री निरीक्षक माधव चव्हाण, संजय साळवे, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, शरद नरळे, प्रशांत नागरगोजे सहा.दु.निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सागर आवळे, मनिष माने, भिमराव माळी, अजित रसाळ,आबासाहेब जानकर,राजेंद्र अवघडे, अरुण जाधव, किरण जंगम, सचिन जाधव, राणी काळोखे जवान यांनी सहभाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास श्री.माधव चव्हाण निरीक्षक हे करीत आहेत.
जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहन श्रीमती किर्ती शेडगे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 6th Nov 2023 06:56 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Mon 6th Nov 2023 06:56 pm













