सातारा शहरात जबरी चोरी विनयभंग अपहरण शिवीगाळ दमदाटी प्रकरणी दोन जण दोन वर्षा साठी तडीपार

सातारा : सातारा शहरात जबरी चोरी करणे विनयभंग करणे, अपहरण करणे शिविगाळ दमदाटी करणे या सारख्या गंभीर गुन्ह्यात दोन गुन्हेगारांना सातारा पोलीस अधीक्षक यांनी दोन वर्षासाठी तडीपार केले आहे प्रतिबंधक कारवाई करून सदर टोळीच्या संशयित हालचालीस प्रतिबंध झालेला नाही तसेच त्यांच्या या कृत्याने सामान्य जनतेचे फार मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान होत असल्याने त्याना हद्दपार व कायद्याचा धाक नसून ते बैकायदेशीर कारवाया करीत असल्याने त्यांना वारंवार सुधारण्याचे संधी देऊनही त्यांच्यात सुधारणा झाली नसल्याने सामान्य जनतेला त्यांचा उपद्रव होत असल्याने जनतेमधून त्यांच्यावर कठोर कारवाई करता मागणी होत होती त्यानुसार  समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलमानुसार 55 अन्वये दोन वर्षाकरिता त्याना सातारा जिल्ह्यातून हद्दपारचा केले आहे सदर इसम टोळीचा प्रमुख संजय सायबू पवार वय वर्ष 22 राहणार नामदेव वाडी झोपडपट्टी सातारा व अशुतोष सयाजीराव भोसले वय वर्ष 23 टोळीचा सदस्य राहणार कृष्णविहार सोसायटी कृष्णा नगर गोडोली असे हद्दपार केलेली दोन आरोपींची नावे आहेत 
या कारवाईसाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री मधुकर गुरव पोलीस प्रमोद सावंत पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला असून या  कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त