सातारा जिल्ह्यातील २७ वर्षीय युवतीचा विनयभंग
Satara News Team
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
- बातमी शेयर करा
सातारा : नोएडा येथील कंपनीत नोकरीला असलेल्या सातारा जिल्ह्यातील २७ वर्षीय युवतीचा विनयभंग आणि कुटुंबीयांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी संकल्प जैस्वाल याच्यावर फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी युवती सध्या गावी असून ती वर्क फ्रॉम होम करते. संशयिताने युवतीसह तिच्या कुटुंबियांना फोनवरुन धमकी देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा येथील २७ वर्षाची युवती ही नोएडा येथील एका कंपनीत काम करते. तिचे काम वर्क फ्रॉम होम असे आहे. ती घरातून काम करत असताना नोएडा येथील संकल्प जैस्वाल हा युवक हा तिला सप्टेंबर २०२२ पासून ते १८ मे २०२४ पर्यंत सतत फोनवरुन टॉर्चर करायचा. तो कंपनीतला तिचा वरिष्ठ अधिकारी आहे. त्याने फिर्यादी युवतीच्या मोबाईलवर फोन करुन तसेच व्हॉट्सअपवर तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. युवतीने त्याला आपले लग्न ठरले असल्याचे सांगितले. तरीही त्याने तिच्या आई, वडील, भाऊ, चुलतीला फोन करुन तिची बदनामी केली. शिवीगाळ केली म्हणून तिने त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
संबंधित बातम्या
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 15th Feb 2024 08:44 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 15th Feb 2024 08:44 pm












