अल्पवयीन युवतीने लग्नासाठी तगादा लावल्याने अल्पवयीन युवकाने संपवले जीवन

दहिवडी : माण तालुक्यातील वावरहिरे येथील अल्पवयीन युवतीने लग्नासाठी तगादा लावल्याने एका अल्पवयीन युवकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार, दि. १५ रोजी घडली. दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. बापू जक्कल काळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, वावरहिरे येथील अल्पवयीन मृत युवक बापू जक्कल काळे (वय १८) याला एका अल्पवयीन युवती हिने शिवीगाळ व दमदाटी करून ‘तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेन,’ अशी धमकी दिली. यामुळे युवकाने राहत्या घरातच बुधवार दि. १५ रोजी बारा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. अशी फिर्याद मुलाची आई कविता जक्कल काळे हिने दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये दिली.

सदर घटनेची तत्काळ चौकशी करून दहिवडी पोलिसांनी आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अल्पवयीन युवतीवर गुन्हा नोंद केला. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी अश्विनी शेंडगे करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त