मा.शंभूराज देसाई हे फक्त पाटण आणि सातारा शहराचे पालकमंत्री आहेत काय?

खटाव तालुक्यातील पाण्यावर विद्युतनिर्मिती प्रकल्प सुरू करणार?

खटाव  : महाराष्ट्रातील तीनचाकी निष्क्रिय सरकार ने महाराष्ट्रातील काही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा या तालुक्यांचा समावेश केला त्याबद्दल मनापासून आभार. मात्र माण आणि खटाव तालुक्याचा या यादीत समावेश नाही, कारण आमचा माण आणि खटाव तालुका सुजलाम सुफलाम आहे शिवाय माण खटाव चे दमदार आमदार यांना "जलनायक" हे ब्रीद वापरले जात असल्यानेच कदाचित दुष्काळी यादित आमचे नाव नाही, मागच्या सलग चार पाच महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे माण-खटाव तालुक्याचा समावेश दुष्काळाच्या यादीत नाही, आमच्या तालुक्याची पाणीपातळी सुद्धा एवढी वाढलेली आहे की लहान मुलांनी खेळण्यासाठी हाताने छोटासा खड्डा जरी खोदला तरी किमान चार ते पाच एकर शेतजमीन भिजवता येइल एवढ पाणी लागत आहे.

              आमच्या येरळवाडी धरणासह तालुक्यातील सर्वच धरणे आणि पाणी साठे तुडुंब भरून वाहत आहेत. पारगांव तलावाच्या पातळीत एवढी वाढ झाली आहे कि त्याचे पाणी सांडीतून बसत नसल्याने कराड रोड बहुतांश पाण्याखालीच असतो. ओढे, नदी, नाले सर्वच एवढे भरलेले आहेत की एका गावातून दुसऱ्या गावी जाण्यासाठी वाहणांच्या सोबत जहाजांचा देखील वापर करण्यात येत आहे. तर किराणा खरेदी करीता बोटींचा वापर सुरू आहे. पुढची काही वर्षे पाऊस पडला नाही तरीही हे पाण्याचे साठे सतत भरून वाहतील असा प्रशासनाने सरकारला अहवाल सादर केला असावा. त्यामुळे येत्या काळात कोयना धरणावरून होणाऱ्या विद्युतनिर्मिती पेक्षा मोठा विद्युतनिर्मिती प्रकल्प माण खटावच्या भागात उभारण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी चर्चा माण खटाव वासीयांमध्ये सुरू आहे.

              आशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रम्य वातावरणात इथली हवा अतिशय उत्तम प्रकारची झाली आहे. त्यामुळे हवा घेण्यासाठी आणि हवा घेताना सेल्फी काढण्यासाठी तालुक्यात लवकरच साक्षात प्रशासकीय उच्च अधिकारी, लोकप्रतिनिधी येणार असल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. त्या दरम्यान संगीत आणि गायनाचा कार्यक्रम ही बहुधा आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

        या सर्व बाबींमुळे सातारा जिल्ह्याचे विद्यमान कर्तृत्ववान पालकमंत्र्यांची इच्छा असुनही माण खटाव तालुक्याच्या दौऱ्यात अडचणी निर्माण होत असावी. म्हणूनच कि काय माण खटाव तालुका आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी महत्त्वाचे केंद्र झाला आहे. त्यामुळे खास पालकमंत्री महोदयांचा हट्ट पुरविण्यासाठी खटाव तालुक्यात  एक International Airport  आणि बंदर तयार करण्याचा विचार सरकार करत आहे काय? अशी शंका व्यक्त करत मा. शंभूराज देसाई हे फक्त पाटण आणि सातारा शहराचे पालकमंत्री आहेत काय? असा प्रश्न जनसामान्यां मधून उपस्थित केला जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त