साताऱ्यातील 'हिडन कॅफे'त निरोधांचा खच; कॅफेत अश्लील चाळ्यांत गुंततेय युवा पिढी
Satara News Team
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहर आणि उपनगर परिसरात कपल कॅफेंमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याबाबत सातारा न्यूजने वेळोवेळी आवाज उठविला होता. मात्र, अशा आक्षेपार्ह कॅफेंवर सातारा पोलिसांकडून केवळ समज देण्याची कारवाई करण्यापलीकडे कोणतीही ठोस भूमिका घेण्यात येत नाही. यामुळेच साताऱ्यात शालेय अल्पवयीन मुला-मुलींसह युवक-युवती मोठ्या प्रमाणात शाळा व कॉलेज बुडवून कॅफेंमध्ये अश्लील चाळे करत असल्याचे आढळून येत आहे.
आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या पदाधिकारी असलेल्या युवती जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, सातारा शहराध्यक्ष अक्षय कांबळे, तालुका युवक अध्यक्ष रवींद्र बाबर यांनी अजंठा चौक येथील प्रीती हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या 'द हिडन कॅफे' या कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याची कुणकुण लागताच त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी अश्लील प्रकार सुरु असल्याचे समोर आले. यावेळी संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधून घटनास्थळी बोलविले. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सामोपचाराची भूमिका घेतल्यानंतर सातारा न्यूजने आवाज उठविताच पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा शहर पोलिसांना सूचना देताच खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी कारवाईची भूमिका घेतली. यावेळी सदर कॅफेमध्ये आक्षेपार्ह स्थितीतील बैठक व्यवस्थेसह मोठ्या प्रमाणात वापरलेल्या निरोधचा अक्षरशः खच आढळून आला. यामुळे सातारा शहरातील अंधाऱ्या कॅफेंमध्ये नक्की काय चालू असेल याचा भयानक अंदाज सातारकरांना आला. यावेळी पोलिसांनी कॅफेमधील युवक-युवतींना पोलीस ठाण्यात आणून समाज देऊन सोडून देण्यात आले.
दरम्यान, सातारा शहरात असे अनेक कॅफे असून अशा कॅफेंमध्ये मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींचे अश्लील कृत्ये सुरु असतात. यापुढे अशा कॅफेंवर कारवाई न केल्यास आरपीआय स्टाईलने तोडफोड आंदोलन करू, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस कोणती भूमिका घेवून सदर कॅफे कायमस्वरूपी सील करणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
संबंधित बातम्या
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Fri 21st Apr 2023 06:48 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Fri 21st Apr 2023 06:48 pm












