महाबळेश्वर बस स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा

महाबळेश्वर : महाबळेश्वर बस स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेवरुन काल (बुधवार) सकाळपासून दहशतवाद विरोधी शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकाने बसस्थानक व टॅक्सी स्टॅंड परिसराची पाहणी केली.
   या विषयी अधिक माहिती अशी की, महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असणाऱ्या महाबळेश्वर बसस्थानकात बॉम्‍ब ठेवला असल्याचा फोन अज्ञात व्यक्तीने (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गाडी क्रमांकासह पोलिसांना केला होता. यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा महाबळेश्वर एसटी स्टॕन्डवर घेऊन परिसराची तपासणी केली. मात्र हा फेक कॉल असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली. दरम्यान फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त