चांदवडी येथे सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन नितीन पाटील यांच्या हस्ते संपन्न.


चांदवडी : श्री भैरवनाथ वार्ड क्रमांक १ मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत  जननायक मकरंद (आबा) पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या चांदवडी ते बुद्ध विहार  कडे जाणारा  सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे   भूमिपूजन  शुभारंभ रविवार
  दिनांक ०९/०३/२०२४   रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन  नितीन (काका) लक्ष्मणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  व किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन व माजी पंचायत समिती सभापती प्रमोद दादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
 यापुढेही  जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात चांदवडी वेलंग गावचा  विकास केला जाईल. गावच्या विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही यावेळेस नितीन काका पाटील यांनी  ग्रामस्थांना  आवर्जून सांगितले.
     यावेळी चांदवडी गावचे उपसरपंच रामदास पांडुरंग शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य संतोष जनार्दन शिंदे यांनी  सूत्रसंचालन  केले तर कार्यक्रमाचे आभार  माजी सरपंच सुनील श्रीपती शिंदे यांनी मानले.शशिकांत सर्जेराव काकडे युवा उद्योजक अध्यक्ष नेरूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई यांनी कार्यक्रमासाठी   शुभेच्छा दिल्या.
       कार्यक्रमा साठी चांदवडी गावच्या महिला सरपंच फरीदा अहमद शेख, यमुना सर्जेराव काकडे, ग्रामपंचायत सदस्य  स्नेहल अमोल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सौ रेखा संतोष शिंदे, तसेच शशिकांत सर्जेराव काकडे युवा उद्योजक अध्यक्ष नेरूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मोरे, अमोल विठ्ठल शिंदे, नरेश सहदेव वाघ, राजेंद्र किसन शिंदे,प्रकाश पाटलू शिंदे, दत्तात्रेय  पोळ,अनिल जाधव,  विनोद जाधव,  रफिक शेख,  रमजान शेख,  रितेश काकडे,विजय काकडे,सुरज ओंबळे, अनिकेत ओंबळे मंदार काकडे,मच्छिंद्र पोळ असे सर्व ग्रामस्थ मंडळ चांदवडी वेलंग मधील हजर होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त