विनापरवाना रॅली काढून दहशत माजवल्या बद्दल 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सातारा : सातारा शहरामध्ये विनापरवाना स्पीकर लावून हातात दांडक घेऊन दहशत माजवने रॅली काढून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहरातील 21 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहरातील व्यापार्‍यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी दमदाटी केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

यामध्ये दिलीप जगताप, पूजा बनसोडे, प्रतीक गायकवाड, संदीप कांबळे, वैभव गायकवाड, नितीन चव्हाण, बाळकृष्ण देसाई, पांडुरंग माने, विनोद ओव्हाळ, दिलीप सावंत, शरद गाडे, अक्षय कांबळे, विश्वास सावंत व इतरांवर जबरदस्तीने हातात दांडके घेऊन दहशत माजवून दुकाने बंद केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी जबाबदार धरले आहे.

 

 

21 ऑगस्ट रोजी सातारा शहरातील शाहू चौक, मोती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान सकाळी साडे अकरा ते दोन या दरम्यान संबंधितांनी विनापरवाना स्पीकर लावून रॅली काढली. तसेच बाजारपेठेतील दुकानदारांना जबरदस्तीने हातात दांडके घेऊन दुकाने बंद करायला लावली. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे या प्रकरणात उल्लंघन झाले. सातारा शहर पोलिसांनी कलम 189, 119 ( 2) 190, 223, व 351 दोन प्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. के. जायपत्रे अधिक तपास करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त