विमानात बॉम्ब ठेवला आहे. साताऱ्यातील मुलाने केलेल्या कॉल मुळे मुंबईत खळबळ

सातारा : मुंबई विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवला आहे, ते प्लेन दहा तासानंतर उड्डाण करणार आहे, या कॉलने गुरुवारी खळबळ उडाली. चौकशीत हा कॉल साताऱ्यातील १० वर्षांच्या दिव्यांग मुलाने वडिलांच्या मोबाइलवरून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.

या कॉलच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तत्काळ बैठक घेण्यात आली. सहार पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि एटीसी पथक, एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. चौकशीत, तो कॉल खोटा असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नवी मुंबईच्या नियंत्रण कक्षात हा कॉल आला होता.

तो कॉल सातारा, देऊळ गावातील विकास माणिकचंद देसाई यांचा क्रमांक असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करताच, तो कॉल त्यांचा १० वर्षीय दिव्यांग मुलाने चुकून केल्याचे सांगितले. 

गुन्हेगारी मालिका पाहण्याचा परिणाम

मुलगा घरातच असल्याने सतत गुन्हेगारी जगतावरील मालिका पाहण्याची त्याला आवड असून त्यातूनच त्याला ११२ हा क्रमांक मिळाला व त्याने कॉल केल्याचे समोर आले. त्याच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. मुलाने टाईमपास म्हणून घरात खेळता खेळता हा कॉल केल्याचे सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला