दुसरीतील विद्यार्थ्यास वळ उठेपर्यंत शिक्षिकेने चापटले

सातारा : एका नामवंत शिक्षण संस्थेच्या सोमवार पेठ सातारा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांस किरकोळ कारणावरून एका शिक्षिकेने वळ उठेपर्यंत गालावर हाताने मारहाण केली आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

याबाबत पालकांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, त्यांचा सात वर्षीय मुलगा हा नवीन मराठी शाळा, सातारा येथे “इयत्ता २ री-ब या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवार, दि. ५ जानेवारी २०२४ रोजी शाळा सुटण्याच्या वेळेत मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी गेले असता, त्याच्या गालावर व्रण व वळ आढळून आले. याबाबत संबंधित पाल्यास विचारले असता, मनिषा चव्हाण मॅडम यांनी छंद विषयाची माहिती वहीत लिहून पूर्ण झाली नाही म्हणून चव्हाण मॅडम यानी हाताने गालावर जोरदार चापट मारल्याचे त्याने सांगितले. याबाबत चव्हाण मॅडम यांना भेटुन विचारले असता “रागाच्या भरात मी तुमच्या मुलास मारले” असे कोणतीही अपराधी भावना न दाटू देता अगदी सहजपणे सांगितले. स्वतःच्या या कृत्याबद्दल त्यांनी कोणताही खेद व्यक्त केला नाही. तसेच पालकांनी मुख्याधापक, शिस्त समिती किंवा शालेय व्यवस्थापन समितीला भेटू का? असे विचारले असता, “तुम्ही कुठेही जा. मला काही फरक पडत नाही. माझे वरप‌र्यंत हात आहेत. माझे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही,” अशी उद्धट उत्तरे दिली.दरम्यान, मनिषा चव्हाण यांच्याकडे उपमुख्याध्यापिका म्हणूनही जबाबदारी आहो त्यामुळे त्यांचे अध्यापनाकडे आजिबात लक्ष नसते. शालेय प्रशासन व पदाधिकारी यांच्यासमोर पुढे पुढे करण्यातच त्यांना रस असतो, असा सर्वच पालकांचा अनुभव आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मारहाण व शारिरीक शिक्षा करू नये, या नव्या शैक्षणिक नियमांचा भंग संबंधीत शिक्षिकेकडून होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकाही अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात, असा आजवरचा अनेक पालकांचा अनुभव आहे.

चव्हाण मॅडम यांनी केलेल्या शिक्षेमुळे तो मुलगा तापाने अक्षरशः फणफणत आहे. अशा पद्धतीने त्याला दिलेली शिक्षा हे कृत्य अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्याची मानसिकता बिघडते, असेही पालकांनी म्हटले आहे. विद्यार्थ्याच्या गालावर वळ उठेपर्यंत शिक्षिकेकडून शिक्षा म्हणून झालेली मारहाण हा प्रकार गंभीर असल्याची चर्चा पालकांसह शाळा परिसरात सुरू आहे.

संबंधित शिक्षिकेवर शिक्षणाधिकारी, शाळा प्रशासन नेमकी काय कारवाई होते याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे. दरम्यान, संबंधित पालक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.

 

डेक्कन एज्युकेशन सोसायटी अथवा नवीन मराठी शाळा कोणत्याही प्रकारच्या शारीरिक शिक्षेचे (कॉर्पोरल पनिशमेंट) समर्थन करत नाही किंबहुना त्याच्या विरोधात आहे. नवीन मराठी शाळेचे काम विद्यार्थी केंद्रीत ठेवण्याचा व्यवस्थापनाचा आटोकाट प्रयत्न असतो. सदर घटनेबाबत संस्था स्तरावर कोणताही तक्रार अर्ज अद्याप प्राप्त झालेला नाही. तक्रार प्राप्त होताच त्याची शहानिशा करून आवश्यक ती योग्य व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अमित कुलकर्णी ,अध्यक्ष, शालेय समिती,नवीन मराठी शाळा, सातारा.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला