भंगारातील व्हील चेअरचे गौडबंगाल काय? त्यांची तक्रार मात्र अद्याप तपास जैसे थेच
विजय माने - Fri 29th Jul 2022 05:03 am
- बातमी शेयर करा
शासनाकडून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाटप केले नसल्याचे समोर आले आहे. मात्र शहरातील एका भंगार व्यवसायिकाकडे मोठ्या प्रमाणात भंगारात व्हीलचेअर आढळून आल्या होत्या. रातोरात त्या पुन्हा अन्यत्र हलवल्या असल्याने. या प्रकरणावर पडदा पडला आहे. मात्र दिव्याग बांधवांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संबधित त्या दोन अधिकाऱ्यांची तक्रार केल्याने पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला असून. येत्या काळात आंदोलन करणार असल्याची माहिती दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी गणेश दुबळे यांनी दिली आहे.
सातारा : शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीतील एका प्रसिध्द भंगार व्यवसायीकाकडे स्क्रॅप साठी तीन ट्रक भरून पॅकपीस असलेल्या व्हिल चेअर कोणी भंगारात दिल्या, त्या नेमक्या सातार्यात कोठून आल्या? इतक्या मोठ्या प्रमाणात सुस्थितीत असलेल्या व्हिल चेअर भंगारात देण्यामागचे कारण काय ? नक्की भंगाराच्या दुकानात आढळून आलेल्या व्हिल चेअरचे गौडबंगाल काय? दिव्यांग बांधवानी चौकशी करताना त्या पोलीस आधिकार्यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित केला असुन नेमक्या या प्रकाराबद्दल पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊ न आठवडा उलटला तरी अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती पुढे आली नसल्याने भंगारातील व्हिल चेअर मागचे गौडबंगाल काय असा प्रश्न सातारा वासीयांना भेडसावत आहे. दिव्यांग बांधवानी दिनांक 21 जुलै रोजी सातारा पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी करण्याबाबतचे निवेदन दिले. यामध्ये भंगारात इतक्या मोठ्या प्रमाणात व्हिल चेअर आल्या असल्याची माहिती संबधीत त्या दोन आधिकार्यांना होती. मात्र त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारे कारवाई केली नसल्याचा आरोप करत आधिकार्यांबाबतच दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. मात्र अद्याप या तक्रारीची दखल घेतली नसल्याने सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या भुमिकेकडे शहरातील दिव्यांग बांधव डोळे लावून बसले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, 20 जुलै रोजी बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात असणार्या शहीद संतोष महाडिक पोलीस चौकी नजीक असणार्या एका भंगाराच्या दुकानात तीन ट्रक पॅकपीस व्हील चेअर भंगारात देण्यात आल्याची माहिती सातारा शहर व परिसरातील दिव्यांग बांधवांना समजताच त्यांच्यातून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात असणार्या एका भंगाराच्या दुकानात तीन ट्रक पॅकपीस व्हील चेअर भंगारात नक्की कोणी दिल्या. कोणत्या ठिकाणावरून त्या मोळाच्या ओढ्यावर आणण्यात आल्या., यासंदर्भात नक्की शासकीय व्यक्तिंचा,संस्थांचा सहभाग आहे का असे अनेक प्रश्न दिव्यांग बांधवानी उपस्थित केले आहेत. दिव्यांग बांधवाना विविध शासकीय योजनेतुन अशा व्हिलचेअर शासन संस्था मोठे कार्यक्रम करून देत असतात. नक्की मग कोणत्या ठिकाणाहून दिव्यांग बांधवांच्या हक्काच्या असणार्या या व्हिलचेअर भंगारात देण्यात आल्या. ही गंभीर बाब असुन याबाबत सातारा शहरातील दिव्यांग बांधवांनी पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे
#sataranews
#sataranewsonline
#satarahandicapnews
#satarawheelchare
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Fri 29th Jul 2022 05:03 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 29th Jul 2022 05:03 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 29th Jul 2022 05:03 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 29th Jul 2022 05:03 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 29th Jul 2022 05:03 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 29th Jul 2022 05:03 am
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Fri 29th Jul 2022 05:03 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Fri 29th Jul 2022 05:03 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Fri 29th Jul 2022 05:03 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Fri 29th Jul 2022 05:03 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Fri 29th Jul 2022 05:03 am
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Fri 29th Jul 2022 05:03 am
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 29th Jul 2022 05:03 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Fri 29th Jul 2022 05:03 am













