सोलापूर जिल्हयातील दिग्गज नेतेमंडळींना, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जवाटप प्रकरणी मोठा झटका
Satara News Team
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
- बातमी शेयर करा
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २३८ कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी, एका चार्टड अकाउंटंटकडून वसुली करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी काढले आहेत. तत्कालीन संचालक मंडळातील ३५ जणांकडून एकूण २३८ कोटी ४३ लाख ९९९ हजाराच्या बेकायदेशीर कर्जाची १२ टक्के व्याजासह वसुली करण्यासाठीचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी जारी केले आहेत. विभागीय सहनिबंधक यांनी काढलेल्या आदेशामुळे बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटील, दीपक आबा साळुंखे, राजन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, रश्मी बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात २०१० साली राजेंद्र राऊत यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर कलम ८३ आणि ८८ नुसार चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट झाले होते. संचालक मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संस्थांना कर्ज घेतले. मात्र त्या कर्जाची परतफेड केली नसल्याने बँक अडचणीत आल्याचा ठपका या चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळासह अधिकारी आणि चार्टड अकाउंटंट यांना देखील जबाबदार धरण्यात आले होते. या चौकशी अहवालानंतर आता विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी कलम ९८ अन्वये जबाबदार धरण्यात आलेल्या संचालक मंडळाकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.
वसुलीस पात्र असलेल्यांची यादी खालील प्रमाणे –
दिलीपराव सोपल – ३० कोटी २७ लाख २८ हजार १२२ रुपये
विजयसिंह मोहिते – पाटील – ३ कोटी ०५ लाख ५४ हजार २४२ रुपये
दीपक साळुंखे – पाटील – २० कोटी ७२ लाख ५१ हजार २७० रुपये
सुधाकरपंत परिचारक – ११ कोटी ९३ लाख ०६ हजार २७७ रुपये
प्रतापसिंह मोहिते – पाटील – ३ कोटी १४ लाख ६५ हजार ९४७ रुपये
राजन पाटील – ३ कोटी ३४ लाख २१ हजार ३५७ रुपये
संजय शिंदे – ९ कोटी ८४ लाख ४४ हजार ७९९ रुपये
बबनराव शिंदे – ३ कोटी ४९ लाख २३ हजार ०४१ रुपये
दिलीप माने – ११ कोटी ६३ लाख ३४ हजार ५६८ रुपये
रणजितसिंह मोहिते – पाटील – ५५ लाख ५४ हजार ६६० रुपये
चांगोजीराव देशमुख – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
एस. एम. पाटील – ८ कोटी ७१ लाख ८७ हजार ६७८ रुपये
चंद्रकांत देशमुख – ८ कोटी ४१ लाख २९ हजार ३९९ रुपये
जयवंतराव जगताप – ७ कोटी ३० लाख ०३ हजार ५४२ रुपये
रामचंद्र वाघमारे – १ कोटी ४८ लाख ६७ हजार ५१६ रुपये
सिद्रामप्पा पाटील – १६ कोटी ९९ लाख ८० हजार ३९३ रुपये
सुरेश हसापुरे – ८ कोटी ०३ लाख ०७ हजार ५५९ रुपये
बबनराव अवताडे – ११ कोटी ४४ लाख ८१ हजार ४१२ रुपये
राजशेखर शिवदारे – १ कोटी ४८ लाख ६७ हजार ५१६ रुपये
अरुण कापसे – २० कोटी ७४ लाख ७८ हजार ५१६ रुपये
संजय कांबळे – ८ कोटी ४१ लाख २९ हजार ३९९ रुपये
बहिरू वाघमारे – ८ कोटी ४१ लाख २९ हजार ३९९ रुपये
सुनील सातपुते – ८ कोटी ४१ लाख २९ हजार ३९९ रुपये
रामदास हक्के – ८ कोटी ४१ लाख २९ हजार ३९९ रुपये
चांगदेव अभिवंत – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
भर्तरीनाथ अभंग – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
विद्या बाबर – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
सुनंदा बाबर – १० कोटी ८४ लाख ७२ हजार ५५९ रुपये
रश्मी दिगंबरराव बागल – ४३ लाख २६ हजार १०९ रुपये
नलिनी चंदेले – ८८ लाख ५८ हजार ६६३ रुपये
सुरेखा ताटे – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
सुनीता बागल – १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये
किसन मोटे – ५ लाख रुपये
कें. आर. पाटील – ५ लाख रुपये
संजय कोठाडीया – ९१ लाख १२ हजार ३६९ रुपये
एकूण – २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपय
#solapurDCCBANK
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 7th Dec 2024 05:16 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 7th Dec 2024 05:16 pm













