विकसित भारत संकल्प यात्रा वाठार किरोली येथे उत्साहात

वाठार (किरोली), :  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि विकसित भारत संकल्प यात्रा असा संयुक्त कार्यक्रम येथे कोरेगाव पंचायत समिती, महसूल विभाग, कृषी विभाग इत्यादी विभाग तसेच वाठार किरोली ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने  उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते भीमराव पाटील काका, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सपना जाधव, कृषी विस्तार अधिकारी साफिया मुल्ला, संजय बर्गे, कृषी अधिकारी हेमांगी शेडगे, सांख्यिकी विस्ताराधिकारी यशेंद्र क्षीरसागर, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती चंदुरे, यात्रा समन्वयक अरुण घोरपडे,तालुका निरीक्षक भूमी अभिलेख लता घरत, जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि दोन अंबामाता विद्यालयचे शिक्षक, विद्यार्थी ग्रामस्थ तसेच; इतर खातेप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केला. सावित्रीबाई फुले यांच्या विषयीची नाटिका सर्वांना विशेष भावली. काही विद्यार्थ्यांनी भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा पट उलगडून दाखवला.यावेळी लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले. यावेळी विकसित भारतची प्रतिज्ञा घेण्यात आली. लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. घरकुल लाभार्थी, ग्रामीण जीवन उन्नती अभियान लाभार्थी, कृषी लाभार्थी विहिरी, तळ्यांचे लाभार्थी, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना जननी सुरक्षा योजना या सर्व लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या लाभा विषयी माहिती दिली. यावेळी भीमराव पाटील यांनी विकसित भारत संकल्प यात्रेची संकल्पना स्पष्ट केली. गावाच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग तसेच शासनाच्या विविध योजनांचे महत्त्व त्यांनी विशद केले. तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करताना अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास महत्त्वाचा असण्याबाबत काही सूचना केल्या. सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांनी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. उमेद च्या प्रमुख सोनाली धर्माधिकारी यांनी स्त्री जीवन आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य याविषयी मनोगत व्यक्त केले. कृषी विभागामार्फत औषध फवारणीचे ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त