केळघर विभागात खैराच्या झाडांची तस्करी... वन विभागाकडून दुर्लक्ष

भाजप तालुकाध्यक्षांनी उघडकीस आणला प्रकार तरी सुद्धा वन विभागाकडून दुर्लक्ष

मेढा : केळकर विभागामध्ये खैराच्या झाडाची राजरोस कत्तल होत आहे या खैराच्या झाडाचा उपयोग गुटखा बनवण्यासाठी होतो. वन विभागात असलेले अधिकारी मात्र या  प्रकाराकडे कानाडोळा करत आहेत. वनविभागाचे फिरते पथक नॉट रिचेबल आहे. या विभागाला फोन केला तरी फोन उचलत नाहीत अशी तक्रार आहे किंवा त्या फोनचा रिप्लाय देखील येत नाही वन विभाग मॅनेज झाले असे समजते त्यांच्या आशीर्वादामुळेच खैराच्या झाडाची कत्तल होत आहे असा आरोप भारतीय जनता पार्टीचे  तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळेनी केला आहे. या तस्करी मध्ये सामील असलेले तसेच वृक्षतोडीस जबाबदार असलेले बेजबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी श्रीहरी गोळे यांनी केली आहे. तस्करी मधील लाकूड साठा स्वतः गोळे यांनी निदर्शनास आणून दिला आहे.

खैराची खैराचे झाड कापून झाले की खाली राहिलेल्या खोडाचे जाळून पुरावा नष्ट केला जात आहे वनविभागाच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचं भाजप तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी सांगितला आहे गुटखा बनवण्यासाठी उपयोग होत असलेल्या खायराच्या लाकडाला किलोला 40 ते 50 रुपये भाव मिळतो एका झाडापासून दोन ते तीन टन लाकूड मिळते त्यामुळे खैराच्या झाडाची तोड होत आहे स्थानिकांचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे परंतु वन विभागाच्या आशीर्वादानेच खायला झाडाची तस्करी सुरू असल्याचे भाजप तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी सातारा न्यूजशी बोलताना सांगितले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला