उच्चस्पद अधिकाऱ्याची केवळ चौकशीच नाहीतर अटक करावी

धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

सातारा : सहाय्यक धर्मादाय आयुक्तातील अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराबाबत सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.परंतु त्यावेळी प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले होते. आता याच कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. त्यामुळे आम्ही केलेले आंदोलन योग्यच होते हे यावरुन स्पष्ट होत आहे. आता तरी या कार्यालयातील उच्चस्पद अधिकाऱ्याची केवळ चौकशी न करता त्यांना प्रसंगी अटकही झाली पाहिजे अशी मागणी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे. 

पत्रकात, सातारा जिल्ह्यातील सहा धर्मादाय आयुक्त या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. जाणीवपूर्वक त्रास देणे, मनमानीपणे तारखा देणे, विनाकारण पक्षकारांची प्रस्ताव नामंजूर करणे, आर्थिक तडजोडी करणे, त्या न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचे सांगितले जाते आहे. याबाबत या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची  खातेनिहाय सखोल चौकशी करून, पक्षकार, सामाजिक संस्था, संघटना यांना न्याय द्यावा. संबंधीत सहाय्यक धर्मादाय आयुक्त आणि या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी १ डिसेंबर २०२३ ला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन केले होते. त्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते. आता याच कार्यालयातील कर्मचारी लाच स्वीकारताना लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात सापडला आहे. त्यामुळे आमच्या तक्रारीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले त्याचेच हे फळ आहे. आता या सापडलेल्या कर्मचाऱ्याची कसून चौकशी झाली पाहिजे. त्याच्याअडून धर्मादाय आयुक्त कार्यालयातील उच्चस्पद अधिकाऱ्याचीसुध्दा चौकशी झाली पाहिजे. कारण ज्या पदावर सदर व्यक्ती काम करत आहे, मिळणारा हिस्सा सुध्दा त्या व्यक्तीकडे पोच होत असणार अशी शंका सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उच्चस्पद अधिकाऱ्यांच्या चौकशीवर न थांबता संबंधित उच्चस्पद अधिकाऱ्यांनासुध्दा अटक झाली पाहिजे अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. 
आम्ही केवळ लोकांच्या सांगण्यावरुन एखाद्या विरोधात आंदोलन करत नाही तर तक्रार आल्यानंतर माहिती अधिकारातंर्गत माहिती गोळा करतो, त्यात तथ्य आढळले तरच आंदोलन करतो, विनाकारण कोणालाही त्रास देत नाही हे या प्रकरणावरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, उपनगराध्यक्ष शंकर माळवदे , पत्रकार पद्माकर सोळवंडे, सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी व्यक्त केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त